शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
4
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
5
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
6
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
7
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
8
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
9
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
10
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
11
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
12
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
13
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
20
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
Daily Top 2Weekly Top 5

पांढऱ्या सोन्याची सीसीआयकडून कासवगतीने खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 05:00 IST

आज पावेतो २,३५६ शेतकऱ्यांनी सीसीआयकडे नोंदणी केली आहे. सीसीआयमार्फत खरांगणा येथे १ हजार ५१४ क्विंटल तर रोहणा येथे ३ हजार ६८७ क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. एका शेतकऱ्याला ४० क्विंटल कापसाची विक्री करण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र लॉकडाऊन काळात मालवाहू गाड्या मिळत नसल्याने २०-२० क्विंटल कापूस शेतकऱ्यांना न्यावा लागत आहे.

ठळक मुद्देदररोज केवळ ७०० ते ८०० क्विंटल : तर, खासगी व्यापाऱ्यांची अडीच ते तीन हजार क्विंटल खरेदी

लोकमत न्यूज नेटवर्कदेऊरवाडा/आर्वी : तालुक्यातील सीसीआयच्या केंद्रावर कासवगतीने सुरू असलेल्या कापूस खरेदीमुळे पावसाळा निघणार की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सीसीआयने रोहणा येथे कापूस खरेदी सुरू केली होती. आता रोहणा आणि खरांगणा येथील उपबाजार समितीच्या आवारात तीन-तीन दिवसांचे नियोजन असून दिवस, वार निश्चित नाही. या केंद्रावर दररोज ७०० ते ८०० क्विंटल कापसाची खरेदी केली जात असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव विनोद कोटेवार यांनी दिली.आज पावेतो २,३५६ शेतकऱ्यांनी सीसीआयकडे नोंदणी केली आहे. सीसीआयमार्फत खरांगणा येथे १ हजार ५१४ क्विंटल तर रोहणा येथे ३ हजार ६८७ क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. एका शेतकऱ्याला ४० क्विंटल कापसाची विक्री करण्याची मुभा देण्यात आली आहे.मात्र लॉकडाऊन काळात मालवाहू गाड्या मिळत नसल्याने २०-२० क्विंटल कापूस शेतकऱ्यांना न्यावा लागत आहे. एका दिवशी केवळ वीस ते पंचवीस शेतकऱ्यांचाच शेतमाल खरेदी केला जात असल्याने पावसाळ्यासोबतच हिवाळा उलटून जाईल काय, अशी स्थिती आहे.खासगी व्यापाऱ्यांकडून लूट सुरूचआर्वी येथे कापूस खरेदी करणारे २१ व्यापारी आहेत. तेरा जिनिंग-प्रेसिंग फॅक्टरी आहेत. दररोज दोन ते अडीच हजार क्विंटल कापसाची खासगी खरेदी होत आहे. सीसीआयचा खरेदीचा ५ हजार १०० ते ५ हजार २०० रुपये भाव असून खासगी व्यापारी ४ हजार ५ रुपये भाव देत आहे.आर्वी बाजार समितीचा उपक्रमकोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता बाहेर जिल्ह्यातून शेतकऱ्यांचा माल घेऊन येणाºया गाड्यांचे सोमवारपासून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वाराजवळ निर्जंतुकीकरण करून गाडी समितीत सोडण्यात येत आहे. या उपक्रमाचे शेतकरी, व्यापारी व नागरिकांनी कौतुक केले आहे.जिनिंगमालक, सभापतींनी पालकमंत्र्यांना घातले साकडेआर्वी येथे सीसीआयचे केंसद्र सुरू झाल्यास एका दिवशी जवळपास १०० ते ११० शेतकºयांच्या कापसाची खरेदी होईल. शहरातील कापूस खरेदी करणारे मोठे व्यापारी सीसीआय केंद्र घेण्यास इच्छुक आहे. कापसाचे केंद्र आर्वीत देण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भैय्यासाहेब काळे, सचिव विनोद कोटेवार आणि काही जिनिंग-प्रेसिंग संचालकांनी वर्धा येथे पालकमंत्र्यांची भेट घेत शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेता सीसीआयचे केंद्र देण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :cottonकापूसFarmerशेतकरी