शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय खरेदीला मुहूर्तच साधेना

By admin | Updated: October 18, 2015 02:22 IST

साधारणत: कापूस खरेदीकरिता दसऱ्याचा मुहूर्त साधण्यात येतो. कापूस उत्पादकांचा कापूस निघणे सुरू झाले आहे.

पणन महासंघाला आदेशाची प्रतीक्षा : खासगीत ४,२०० रुपयांचा दर रूपेश खैरी वर्धासाधारणत: कापूस खरेदीकरिता दसऱ्याचा मुहूर्त साधण्यात येतो. कापूस उत्पादकांचा कापूस निघणे सुरू झाले आहे. याची माहिती मिळताच खासगी व्यापाऱ्यांनी खरेदी सुरू केली. शासकीय खरेदीसंदर्भात मात्र अद्याप कुठल्याही सूचना पणन महासंघाकडून येथील शाखेत आल्या नाहीत. खरेदीसंदर्भात निर्णय घेणारे अध्यक्ष व संचालक विदेश वारीवर असल्याने यंदा दसऱ्याचा मुहूर्त टळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खरेदीसंदर्भात उदासिनता व दरासंदर्भातील राजकारण कायम असल्याने कापूस उत्पादकांची कोंडी यंदाही होणार असल्याचे दिसते. कृषी मूल्य आयोगाची ६ हजार ५०० रुपयांची शिफारस झुगारत राज्य शासनाकडून ४ हजार १०० रुपये हमीभाव जाहीर झाला आहे. गत वर्षीच्या तुलनेत झालेली ही वाढ केवळ ५० रुपयांची ठरली. २०१४ च्या हंगामात कापसाला ४ हजार ५० रुपये हमीभाव जाहीर झाला होता. यामुळे दरवाढीसंदर्भातील मुस्कटदाबी सत्ताधारी बदलले तरी तशीच आहे. सोयाबीन हातचे गेल्यानंतर शेतकऱ्यांना कपाशीकडून अपेक्षा होती. मात्र नेहमीप्रमाणे तीही धुळीस मिळणार असल्याचे दिसत आहे. सत्ताधारी विरोधात असताना कापसाला ७ हजार रुपये दर देण्याची मागणी करीत होते. त्यांच्याकडून कृषी मूल्य आयोगाची शिफारस योग्य होती. आता त्यांच्याकडूनही कृषीमूल्य आयोगाची ६ हजार ५०० रुपयांची शिफारस फेटाळत ४ हजार १०० रुपये दर जाहीर करण्यात आला आहे. संचालक व अध्यक्ष विदेशवारीवरशेतकऱ्यांचा कापूस शेतातून निघण्याची वेळ आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना निदान हमीभाव मिळावा अशी अपेक्षा आहे. त्यांची ही अपेक्षा पूर्ण होण्याकरिता पणन महासंघाची किंवा सीसीआयची खरेदी सुरू होणे अपेक्षित आहे. या खरेदीचा निर्णय घेणारे पणन महासंघाचे अध्यक्ष तथा संचालक विदेश वारीवर गेल्यास सूत्रांनी सांगितले. यामुळे कापूस खरेदी संदर्भात अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. यामुळे ती केव्हा सुरू होईल या बाबत संभ्रम निर्माण झाला आहे. शासकीय खरेदी नसल्याने शेतकऱ्यांना त्यांचा कापूस खासगी व्यापाऱ्यांना विकण्याची वेळ आली आहे. एकरी २० हजारांचा होतो खर्चकापूस केवळ खरीपच नाही तर रबी हंगामाचे पीक म्हणूनही ओळखले जाते. पेरणीपूर्व मशागत, बियाणे व खते, पेरणीचा खर्च, निंदन, डवरणी, फवारणी व वेचाई करून कापूस शेतकऱ्यांच्या घरापर्यंत येतो. येथून नंतर बाजारपेठेचा प्रवास. याचा एकंदर उत्पादन खर्च हा ओलिताच्या क्षेत्रात एकरी २० हजारांवर जात आहे. कापूस खरेदी केंद्र केव्हा उघडणारकापसाची वेचाई सुरू झालेली आहे. पणन महासंघाचे व सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र सुरू झालेले नाही. येत्या महिन्यात ही केंद्र सुरू होणार किंवा नाही या बाबतही साशंकता आहे. सण, उत्सव व दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी आर्थिक अडचणीत खासगी व्यापाऱ्यांना कापूस विकत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.