शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

एकाच दिवशी १,९६८ व्यक्तींवर दंडात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 05:00 IST

कोरोना विषाणूच्या संसगार्ला प्रतिबंध करण्यासाठी प्रशासनाने नागरिकांच्या सहकार्याने अनेक उपाययोजना राबवल्या. त्यामुळेच राज्यात कोरोनाचा सर्वात कमी प्रादुर्भाव वर्धा जिल्ह्यात पाहायला मिळतो. पावसाळयाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी स्वत:ची काळजी घेण्यासाठी त्रिसूत्रीचा अवलंब करण्याचे आवाहन प्रशासन करीत आहे. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी रविवारी आणि सोमवारी मास्क न वापरणाऱ्या लोकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.

ठळक मुद्देप्रशासनाचा त्रिसूत्रीवर भर : मास्क न वापरणाऱ्यांकडून ३.९४ लाखांचा दंड वसूल

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शासकीय सुट्टीचा दिवस असलेल्या रविवारी जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांच्या सूचनेवरून जिल्हा प्रशासनातील चार यंत्रणांनी जिल्ह्यात विशेष मोहीम राबवून मास्क न वापरणाऱ्या तब्बल १ हजार ९६८ व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करून त्यांच्याकडून ३.९४ कोटींचा दंड वसूल केला आहे. विशेष म्हणजे मोहीम सोमवारीही राबविण्यात येणार आहे.कोरोना विषाणूच्या संसगार्ला प्रतिबंध करण्यासाठी प्रशासनाने नागरिकांच्या सहकार्याने अनेक उपाययोजना राबवल्या. त्यामुळेच राज्यात कोरोनाचा सर्वात कमी प्रादुर्भाव वर्धा जिल्ह्यात पाहायला मिळतो. पावसाळयाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी स्वत:ची काळजी घेण्यासाठी त्रिसूत्रीचा अवलंब करण्याचे आवाहन प्रशासन करीत आहे. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी रविवारी आणि सोमवारी मास्क न वापरणाऱ्या लोकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. मोहिमेच्या पहिल्या दिवशी सायंकाळी उशीरापर्यंत १ हजार ९६८ व्यक्तींवर कारवाई करीत त्यांच्याकडून ३ लाख ९४ हजार ६० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क वापरणे, हात वारंवार स्वच्छ करणे आणि सोशल डिस्टन्सिंग पाळणे या त्रिसूत्रीचा अवलंब केल्यास आपण कोरोनाचा संसर्ग थांबवू शकतो. लोकांनी स्वयंप्रेरणेने या त्रिसूत्रीचा अवलंब करावा, असेही या मोहिमेद्वारे नागरिकांना समजावून सांगण्यात आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात सर्वच व्यवहार सुरू झाले आहेत. अशावेळी लोकांनी स्वत:हून नियमांचे पालन करावे असे अपेक्षित आहे. मात्र नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन होण्याचे प्रकार वाढल्यामुळे प्रशासनाला पुन्हा दंडात्मक कारवाईची धडक मोहीम हाती घ्यावी लागली. यामध्ये एक सूत्र आणि धडक कारवाई असे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांच्या सूचनेवरून मास्कचा वापर न करणाऱ्यांकडून २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. सकाळी ६ वाजतापासून या मोहिमेला जिल्ह्यात एकावेळी सुरुवात करण्यात आली. यामध्ये महसूल, पोलीस, नगरपालिका आणि ग्रामविकास विभागाचे ३१० अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. त्यांनी सूचनांची प्रभावी अंमलबजावणी केली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या