शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
2
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
3
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
4
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
5
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
6
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
7
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
8
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
9
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
10
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
11
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
12
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
13
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
14
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
15
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
16
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
17
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
18
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
19
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
20
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
Daily Top 2Weekly Top 5

‘रुंद वरंबा सरी’ पद्धतीने होणार कडधान्याची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 05:00 IST

शेतकरी बहूता विविध पिकांची उताराला आडवी पेरणी करता. या पद्धतीपेक्षा रुंद वरंबा सरी पद्धत कशी उपयुक्त आहे याची माहिती सध्या शेतकऱ्यांना दिली जात आहे. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाºया शेतकरी क्लस्टर (गट) ला नि:शुल्क बियाणे कृषी विभागाकडून दिले जाते. इतकेच नव्हे तर सदर योजना वर्धा जिल्ह्यात किती हेक्टवर राबविण्यात यावी यासाठीचे उद्दिष्टही कृषी विभागाला प्राप्त झाले आहे.

ठळक मुद्देकृषी विभागाने कसली कंबर : गावागावात शेतकरी गटांना दिली जातेय माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : अल्प खर्चात जास्त उत्पादन घेण्याच्या उद्देशाला केंद्रस्थानी ठेऊन राष्ट्रीय सुरक्षा कडधान्य अभियान अंतर्गत रुंद वरंबा सरी (बी.बी.एफ.) पद्धतीने जिल्ह्यातील काही भागात यंदा कडधान्याची लागवड होणार आहे. शासनाच्या या योजनेच्या जास्तीत जास्त शेतकरी गटांनी लाभ घ्यावा, यासाठी सध्या कृषी विभागाने कंबर कसली असून सध्या गावागावात जाऊन कृषी विभागाचे अधिकारी या योजनेचे फायदे शेतकऱ्यांना समजवित आहेत.शेतकरी बहूता विविध पिकांची उताराला आडवी पेरणी करता. या पद्धतीपेक्षा रुंद वरंबा सरी पद्धत कशी उपयुक्त आहे याची माहिती सध्या शेतकऱ्यांना दिली जात आहे. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाºया शेतकरी क्लस्टर (गट) ला नि:शुल्क बियाणे कृषी विभागाकडून दिले जाते. इतकेच नव्हे तर सदर योजना वर्धा जिल्ह्यात किती हेक्टवर राबविण्यात यावी यासाठीचे उद्दिष्टही कृषी विभागाला प्राप्त झाले आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासह जास्तीत जास्त शेतकरी गटांना या योजनेचा फायदा देण्यासाठी सध्या कृषी विभागाकडून प्रयत्न होत आहेत.वर्धा जिल्ह्याला सलग तूर गट प्रात्येक्षिक १०० हेक्टर, सोयाबीन अधिक तूर असे आंतर पीक ६०० हेक्टर तर खरीप ज्वारी नंतर चणा पीक पद्धतीवर आधारीत यासाठी ८० हेक्टरचे उद्दिष्ट यंदा मिळाले आहे. त्यासाठी अनुक्रमे १२.५० क्विंटल तूर, ३० क्विंटल तूर व ४५० क्विंटल सोयाबीन तसेच ५ क्विंटल तुरीचे बियाणे जिल्हा कृषी विभागाला प्राप्त झाले असून ते तालुकास्तरावर पोहोचविण्यात आले आहे.वायफड येथे पार पडले प्रात्यक्षिकवर्धा तालुक्यातील वायफड येथे भावी युवा शेतकरी गटाला कृषी विभागामार्फत बीबीएफ पेरणी यंत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. शिवाय तुषार घायवट यांच्या शेतात सोयाबीनची बीबीएफ पद्धतीने कशी लागवड करायची याचे प्रात्यक्षिक शेतकºयांना करून दाखविण्यात आले. सदर प्रसंगी मंडळ कृषी अधिकारी पी. ए. घायतिडक, एस. एस. धुमणे आदींची उपस्थिती होती.किडीचा प्रादुर्भाव झाल्यास अनुदानरुंद वरंबा सरी पद्धतीने लागवड केलेल्या पिकावर किडीचा प्रादुर्भाव झाल्यास शेतकºयाला एकरी २४५ रुपये अनुदान किटकनाशक खरेदी करण्यासाठी दिले जाते. तर निंबोळी अर्क तयार करण्यासाठी एकरी १०० रुपये अनुदान दिले जाते.असे आहे प्रोत्साहनपर अनुदानरुंद वरंबा सरी पद्धतीने पीक लागवड केलेल्या शेतकºयाला एकरी २०० ते ५०० रुपये अनुदान मिळते. आंतर पीक घेणाºयाला २०० तर सलग तूर पीक घेणाºयाला एकरी ५०० रुपये प्रोत्साहनपर अनुदान दिल्या जात आहे.

टॅग्स :agricultureशेती