शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
3
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
4
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
5
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
6
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
7
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
8
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
9
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
10
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
11
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
12
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
13
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
14
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
15
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
16
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
17
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
18
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
19
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
20
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

शनिवारपर्यंत प्राथमिक शिक्षकांची ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करा

By admin | Updated: May 31, 2014 00:06 IST

जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या सेवाज्येष्ठतेची प्रारूप यादी शनिवारी (ता. ३१) पर्यंत जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी उदय चौधरी यांनी प्राथमिक शिक्षण

वर्धा : जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या सेवाज्येष्ठतेची प्रारूप यादी शनिवारी (ता. ३१) पर्यंत जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी उदय चौधरी यांनी प्राथमिक शिक्षण विभागाला दिले आहे. अशी माहिती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने पत्रकातून दिली.प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित समस्या निवारणासंबंधाने महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या पदाधिकार्‍यांसह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय चौधरी यांच्या अध्यक्षतेत आणि शिक्षणाधिकारी धनराज तेलंग यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली. यावेळी शिक्षक समितीने उपस्थित केलेल्या मुद्दांवर निर्धारित वेळेवर कार्यवाहीचे निर्देश यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी उदय चौधरी यांनी दिले. १९९0 नंतर सेवेत आलेल्या स्थायी करण्याबाबत १५ जून पर्यंंत कार्यवाही करण्यात यावी, अंशदायी पेंशन हिशेब करावे, परताव्याच्या रकमा भविष्य निर्वाह खात्यात वर्ग कराव्यात, भविष्य निर्वाह निधीचे २0१२-१३ चे वितरण पत्र जून अखेरपर्यंत शिक्षकांना मिळावे. पात्र शिक्षकांना निवड श्रेणी लागू करण्याचे प्रस्ताव तत्काळ सादर करावे, गत तीन वर्षातील गोपनीय अहवालाच्या साक्षांकित छायाप्रती शिक्षकांना विनाविलंब उपलब्ध करून द्याव्यात, शिक्षकांची बिंदुनामावली अद्यावत करावी, आयकर २४ क्यूची कार्यवाही, सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी, दुय्यम सेवापुस्तकांचे अद्यावतीकरण, शंकर जोगे, दुर्योधन कांबळे यांची वेतन थकबाकी, हिरा येसकर यांना वरिष्ठ वेतन श्रेणी लावण्याची कार्यवाही विनाविलंब करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी चौधरी यांनी संबंधितांना दिल्या. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांत शिकणार्‍या विद्यार्थ्यांंना इंग्रजी माध्यमाच्या गणित, विज्ञान विषयाच्या स्वाध्याय पुस्तिकांसाठी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्‍वासन यावेळी मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी दिले. या बैठकीला वरिष्ठ लेखा अधिकारी ओव्हळ, शिक्षण विभागाचे सहाय्यक प्रशासन अधिकारी संजय शिरभाते, कनिष्ठ प्रशासन अधिकारी अशोक वासनिक, विलास भगत, अशोक पवार, कनिष्ठ सहायक घोटकर उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या शिष्टमंडळात राज्य कार्याध्यक्ष विजय कोंबे, नागपूर विभाग प्रमुख नरेश गेडे, जिल्हाध्यक्ष नरेंद्र गाडेकर, समुद्रपूर शाखेचे अध्यक्ष शीतल बाळसराफ, वर्धा शाखेचे सचिव श्रीकांत अहेरराव यांचा सहभाग होता.(प्रतिनिधी)