शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पाऊस, कोरोनामुळे लाखो रुपयांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2020 05:00 IST

तालुक्यातील आजनडोह येथील प्रगतशील शेतकरी अंबादास डिग्रसे यांनी तीन एकरात उन्हाळी टमाटरची बाग लावली होती. १५ एप्रिलला झालेल्या वादळी पावसाने टमाटर बाग उद्ध्वस्त झाली आहे. त्यातच बाजारपेठेमध्ये टमाटरचे भाव पडल्याने अंबादास डिग्रसे यांचे सहा ते सात लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. टमाटर बागेकरिता लागलेला खर्चसुद्धा निघणार नाही, अशी व्यथा या शेतकऱ्याने व्यक्त केली आहे

ठळक मुद्देतालुक्यातील शेतकरी संकटात, टमाटर, भाजीपाल्याच्या बागा उद्ध्वस्त

विजय चौधरी।लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा (घा.) : तालुक्यातील कन्नमवारग्राम आजनडोह, बांगडापूर, हेटीकुंडी, काजळी, कारंजा परिसरात १५ एप्रिल रोजी झालेल्या वादळी पावसाने शेतकऱ्यांच्या अनेक पिकांच्या बागा उद्ध्वस्त झाल्यात. तर कोरोनामुळे लॉकडाऊन तसेच नागपूर बाजारपेठेमध्ये वाहतुकीची होत असलेली कोंडी अशा अनेक समस्यांमुळे बाजारपेठेत पडलेले भाजीपाल्याचे भाव तसेच वारंवार बदलत असलेली बाजारपेठेची जागा यामुळे भाजीपाला बागायतदार शेतकरी अडचणीत सापडला आहे.तालुक्यातील आजनडोह येथील प्रगतशील शेतकरी अंबादास डिग्रसे यांनी तीन एकरात उन्हाळी टमाटरची बाग लावली होती. १५ एप्रिलला झालेल्या वादळी पावसाने टमाटर बाग उद्ध्वस्त झाली आहे. त्यातच बाजारपेठेमध्ये टमाटरचे भाव पडल्याने अंबादास डिग्रसे यांचे सहा ते सात लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. टमाटर बागेकरिता लागलेला खर्चसुद्धा निघणार नाही, अशी व्यथा या शेतकऱ्याने व्यक्त केली आहेतालुक्यातील बागांतीले भाजीपाला नागपूर बाजारपेठेत मध्ये नेण्यात येतो. मात्र, कोरोनामुळे भाजी बाजारात ग्राहकांची गर्दी होत असल्याने नागपूर महानगरपालिका प्रशासनाने भाजीपाला मार्केट अनेक ठिकाणी हलविले, तर काही मार्केट बंद आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नागपूर येथे नेलेला शेतीमाल परत आणून फेकावा लागला. किंवा बेभाव विकावा लागत आहे. भाजीपाला बागांचे सर्वेक्षण करून शेतकºयांना मदत करण्याची मागणी होत आहे.दरवर्षी टमाटर उत्पादनातून सात ते आठ लाख रुपयाचे उन्हाळी उत्पादन घेतो. यावर्षी अवकाळी पाऊस आणि कोरोनाचा प्रादुर्भाव यामुळे बाजारपेठेत आलेली मंदी व पडलेले भाव यामुळे उत्पादन खर्च सुद्धा निघाला नाही. जूनपर्यंत चालणारी टमाटर बाग आताच उद्ध्वस्त झाली आहे.अंबादास डिग्रसे, भाजीपाला उत्पादक, आजनडोह

टॅग्स :Rainपाऊसcorona virusकोरोना वायरस बातम्या