शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

प्राथमिक आरोग्य केंद्राद्वारे प्रिस्क्रीप्शन योजनेला हरताळ

By admin | Updated: October 30, 2014 22:56 IST

शासनाच्या आरोग्य विभागाने गाजावाजा करून चिठ्ठीमुक्त दवाखाना ही योजना सुरू केली़ यासाठी ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांत औषधी साठा उपलब्ध करून देण्यात आला;

आकोली : शासनाच्या आरोग्य विभागाने गाजावाजा करून चिठ्ठीमुक्त दवाखाना ही योजना सुरू केली़ यासाठी ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांत औषधी साठा उपलब्ध करून देण्यात आला; पण काही दिवस लोटले असतानाच झिरो प्रिस्क्रीप्शन योजनेला हरताळ फासला जात असल्याचे दिसते़ आंजी (मोठी) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधी साठा उपलब्ध नसल्याने औषधांची चिठ्ठी लिहून दिली जात असल्याचे समोर आले़ यामुळे चिठ्ठीमुक्त दवाखान्याचे काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे़ चिट्ठीमुक्त दवाखाना (झिरो प्रिस्क्रीप्शन) ही योजना सध्या वांझोटीच ठरली आहे़ आंजीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये साधे खोकल्याचे औषधही उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे़ यामुळे सामान्य रुग्णांना बाहेरून औषधी विकत घ्यावी लागत आहे़ शासनाच्या योजना ‘एक ना धड, भाराभर चिंध्या’ अशी झाली आहे़ लोकाभिमुख योजनांची घोषणा केली जाते; पण अंमलबजावणी शून्य असते़ यामुळे सामान्यांना योजनांचा लाभ होत नाही़ अशीच अवस्था शासनाच्या झिरो प्रिस्क्रीप्शन या योजनेची झाली आहे. रुग्णांना बाहेरून महागडी औषधी खरेदी करावी लागू नये म्हणून ही योजना राबविण्यात आली होती़ मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी व गाजावाजा करण्यात आला; पण ढिसाळ नियोजनामुळे सामान्यांना दिलासा देणारी ही योजना आचके देत असल्याचे दिसते़ गोरगरीबांसाठी राबविण्यात येणाऱ्या बहुतांश योजना कागदावरच राबविल्या जात असल्याचे वास्तव आहे. राजू परीहार रा. सुकळी (बाई) हे आंजी (मोठी) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गेले होते. त्यांना ताप व खोकल्याचा आजार होता. डॉक्टरांनी त्यांना चार गोळ्या दिल्या आणि खोकल्याचे औषध औषधी दुकानातून विकत घेण्याकरिता चिट्ठी लिहून दिली. वास्तविक, दवाखान्यात औषधी उपलब्ध नसेल तर कर्मचाऱ्यांकरवी औषधी दुकानातून औषध विकत घेऊन रुग्णांना द्यायचे आहे. यासाठी निधीची तरतूदही करण्यात आलेली आहे; पण सामान्य रुग्णांना योजनेचा लाभ मिळू नये, याकरिताच यंत्रणा राबताना दिसते. या प्रकारामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना मोफत आरोग्यसेवेचा विशेष लाभ होताना दिसत नाही़ आंजी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांची हेळसांड होत असल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत़ जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्रातूनच औषधी उपलब्ध करून द्यावी, तेथील कारभारात सुसुत्रता आणावी आणि रुग्णांची हेळसांड थांबवावी, अशी मागणी ग्रामस्थांद्वारे करण्यात आली आहे़(वार्ताहर)