शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

पं.स. चा कारभार जीर्ण इमारतीतून

By admin | Updated: January 8, 2016 02:50 IST

जिल्ह्यात सर्वच पंचायत समितीला नवीन इमारत मिळाल्या असताना सेलू पंचायत समितीचा कारभार मात्र जीर्ण इमारतीतून सुरू आहे.

नवीन कार्यालयाची प्रतीक्षा कायमच : ५२ वर्षांपासून बांधकामच होईनाविजय माहुरे सेलूजिल्ह्यात सर्वच पंचायत समितीला नवीन इमारत मिळाल्या असताना सेलू पंचायत समितीचा कारभार मात्र जीर्ण इमारतीतून सुरू आहे. तालुक्यातील गावांना निधी पुरविणाऱ्या पं.स.लाच इमारत मिळत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. राजकीय व प्रशासकीय उदासिनतेमुळे तब्बल ५२ वर्षांपासून पंचायत समितीला इमारतीची प्रतीक्षा करावी लागत असल्याचे दिसते.सेलू येथे ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थान बांधकाम, तहसील कार्यालयाच्या नवीन इमारतीसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे; पण ६२ ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या गावांचा कारभार चालविणाऱ्या पंचायत समितीच्या जीर्ण इमारतीकडे शासनाचे लक्ष जाऊ नये, ही शोकांतिकाच म्हणावी लागेल. १ मे १९६२ मध्ये येथील पंचायत समिती अस्तित्वात आली. सेलू हिंगणी मार्गावर कोट्यवधी रुपयांची जागा आहे. त्या काळात बांधण्यात आलेले कार्यालय व अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी बांधलेली वसाहत सध्या जीर्ण झाली आहे. निवासस्थाने पडली असून त्याची कवेलू, विटा व लाकूड चोरीला गेले आहे. केवळ कार्यालयाची इमारत कायम असली तरी तीही जीर्ण आहे. प्रत्येक पावसाळ्यामध्ये गळती होऊ नये म्हणून या इमारतीला ताडपत्रीचा आधार घ्यावा लागतो. ७ सप्टेंबर १९६२ रोजी या पंचायत समितीला पहिले सभापती मिळाले आणि लोकप्रतिनिधींद्वारे कारभार पाहिला जाऊ लागला. आतापर्यंत १९६२ ते २०१६ दरम्यान १४ व्यक्तींनी सभापतीपद भूषविले. सेलू तालुक्यातील तीन लोकप्रतिनिधींना जिल्हा परिषदेचे चार वेळा अध्यक्षपद मिळाले. सध्या केंद्र, राज्य, जिल्हा परिषद व पंचायत समितीवर एकाच राजकीय पक्षाची सत्ता आहे. याच तालुक्याकडे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद आहे. यामुळे जीर्ण झालेल्या पं.स. च्या इमारतीचे नव्याने बांधकाम होईल व चांगली इमारत मिळेल, अशी आशा तालुक्यातील नागरिकांना आहे. पशुसंवर्धन, एकात्मिक बाल विकास प्रकल्प, शिक्षण विभागाचे कार्यालय कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या तेव्हाच्या आणि आता जीर्ण झालेल्या निवासस्थानांतून चालविला जात आहे. २००० ते ०१ मध्ये सभापतीकरिता सुसज्ज असे निवासस्थान बांधण्यात आले होते. तेव्हापासून सहा सभापतींनी पंचायत समितीचा कार्यभार सांभाळला; पण भीमराव गोमासे यांनी केवळ दोन वर्षे या निवासस्थानाचा लाभ घेतला. १३ वर्षे या निवासस्थानाचा गोदाम म्हणूनच वापर झाला आहे. समाजकल्याण व महिला बालकल्याण योजनेंतर्गत वितरित करण्यात येणारे साहित्य ठेवण्यासाठी या निवासस्थानाचा व सभागृहाचा वापर केला जात आहे. पं.स. कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना अनुदानावर दिले जाणारे नांगर, स्प्रे-पंप, स्प्रिंकलर पाईप आदी साहित्य ठेवण्यासाठी सेलू शहरातील गोदाम किरायाने घेण्याची वेळ पंचायत समितीवर आली आहे. दहा वर्षांपूर्वी नवीन इमारतीचा पाठविलेला प्रस्ताव शासन दरबारी धूळखात पडून असल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. चांगल्या दिवसाचे स्वप्न दाखविणारे शासन पं.स. ते केंद्रापर्यंत असल्याने नव्या इमारत मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.