शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय मतभेदामुळे सिमेंट रस्ता रखडला

By admin | Updated: November 12, 2014 22:49 IST

वर्धा-अल्लीपूर रस्त्याचे काम गेल्या काही वर्षापासून अर्धवट अवस्थेत आहे. राजकीय मतभेदामुळे हा रस्ता अपूर्णावस्थेत असल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहे.

तळेगाव (टा़) : वर्धा-अल्लीपूर रस्त्याचे काम गेल्या काही वर्षापासून अर्धवट अवस्थेत आहे. राजकीय मतभेदामुळे हा रस्ता अपूर्णावस्थेत असल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहे. दोन वर्षांपूर्वी एकुर्लीपासून वर्धा-हिंगणघाट मार्गाला जोडणाऱ्या तळेगाव फाट्यापर्यंत याच रस्त्याचे पक्के बांधकाम झाले. यामुळे गावातील अंतर्गत रस्तावरुन काही घरामध्ये पावसाळ्याचे पाणी शिरते. मुख्य रस्ता असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रापासून ते झेंडा चौकापर्यंत हा मार्ग सीमेंटचा होणार असल्याने काही वर्षांपूर्वी उद्घाटन झाले होते. बांधकाम साहित्य रस्त्यावर पडून राहिले. कालांतराने सिमेंट रस्त्याचे बांधकाम सुरू करण्यात आले, पण तेही अर्थवटच राहिले. राजकीय मतभेद आणि गावात अतिक्रमणाचा बडगा आल्याने या रस्त्याचे काम थांबले. मुख्य रस्त्यावर अनेकांनी अतिक्रमण केल्याने सध्या एका वाहनाशिवाय दुसरे वाहन या रस्त्यावरून निघत नव्हते. त्यामुळे प्रशासनाने अतिक्रमण हटविले. अतिक्रमणात भिंतीच्या विटा व साहित्य जमा झाले. आम्ही कचरा उचलतो असे नागरिकांनी सांगितल्यानंतरही प्रशासनाने मलबा उचलला नाही. त्यामुळे दगडमाती नालीमध्ये जवळपास दोन महिने पडून राहिले. अखेर पावसाळ्याचे पाणी नालीने जावे, यासाठी ग्रामपंचायतने युध्दपातवळीवर नाली उपसण्याचे काम केले. आता सहा महिन्यांचा कालावधी लोटला. लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका होवून आचार संहिताही संपल्या आहे. अतिक्रमणही हटले आहे. मग राहिलेल्या सिमेंट रस्त्याचे काम केव्हा होईल, या प्रतीक्षेत गावकरी आहे. सिमेंट रस्ता बांधकामात अनेक वेळा राजकीय मतभेद आडवे आल्याने या काम थांबले असावे, असा सूर गावकऱ्यांमध्ये आहे. लोकप्रतिनिधी व प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.(वार्ताहर)