रस्ता खोदकामामुळे रूग्णांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 05:00 IST2020-02-25T05:00:00+5:302020-02-25T05:00:09+5:30

अल्लीपुर ग्रामपंचायतमध्ये जैन कंपनीने पाईपलाईन स्थलांतरीत करूनच गावातील रस्ता व नालीचे बांधकाम करावे असे सर्व सदस्यांच्या संमत्तीने बैठकीमध्ये ठरविले होते. एका भागाकडील रस्ता झाला तेव्हा दुसºया बाजुकडून रस्ता खोदकाम करायला पाहिजे होता. जेणेकरून लोकांना वाहने चालवितांना किंवा पायदळ चालताना अडचण होऊ नये मात्र अल्लीपूर येथे रस्त्याचे काम करीत असतांना दोन्ही बाजूचे रस्ते खोदले आहेत.

Patient condition due to road excavation | रस्ता खोदकामामुळे रूग्णांचे हाल

रस्ता खोदकामामुळे रूग्णांचे हाल

लोकमत न्यूज नेटवर्क
अल्लीपूर : प्राथमिक आरोग्य केंद्रात जाणाऱ्या रस्त्याचे खोदकाम सुरू केले. त्यामुळे मार्ग बंद झाला आहे. यांचा सर्वाधिक त्रास रूग्णांना होत आहे. दवाखान्यात जायला जागा राहिली नाही मोठे खड्डे या मार्गावर करून ठेवले आहे. तसेच पशु वैद्यकीय दवाखान्यात पशुला नेण्यासाठी अडचण निर्माण झाली आहे. अनेक दिवसापासून रस्ता व नालीचें बांधकाम गावात कंत्राटदार कंपनीकडून करण्यात येत आहे.
अल्लीपुर ग्रामपंचायतमध्ये जैन कंपनीने पाईपलाईन स्थलांतरीत करूनच गावातील रस्ता व नालीचे बांधकाम करावे असे सर्व सदस्यांच्या संमत्तीने बैठकीमध्ये ठरविले होते. एका भागाकडील रस्ता झाला तेव्हा दुसºया बाजुकडून रस्ता खोदकाम करायला पाहिजे होता. जेणेकरून लोकांना वाहने चालवितांना किंवा पायदळ चालताना अडचण होऊ नये मात्र अल्लीपूर येथे रस्त्याचे काम करीत असतांना दोन्ही बाजूचे रस्ते खोदले आहेत. एकाही भागातील रस्ता बांधकाम पुर्ण झाले नाही. नळ पाईप लाईन रस्ता बांधकाम सुरू होण्याच्या आधी स्थांनांतरीत न करता रस्ता व नालीचे बांधकाम सुरू केले त्यामुळे सध्या १५ दिवसापासून गावातील गळोबा या वार्डातील नळ बंद आहे. आता पाईपलाईन स्थानांतरीत करणे सुरू केले आहे. गावातील वीज खांब रस्त्याच्या मध्यभागी असुन ते स्थानांतरीत न करता रस्ता काम सुरू करण्यात आले आहे.

ग्रामपंचायतकडून सार्वजनिक बांधकाम विभाग यांना माहिती दिली आहे. त्यांनी येथे एक अभियंता नियुक्त करून कामावर लक्ष द्यावे.
नितीन चंदनखेडे, सरपंच, अल्लीपूर

एका भागातील रस्ता पूर्ण करूनच दुसऱ्या बाजूला काम सुरू करावे. मात्र येथे कामामुळे शाळा, दवाखाना, गॅस एजन्सी या आवश्यक सेवा प्रभावित झाल्या.
विजय कवडे, उपसरपंच, अल्लीपूर

Web Title: Patient condition due to road excavation