शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
3
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
4
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
5
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
6
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
7
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
8
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
9
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
10
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
11
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
12
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
13
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
14
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
15
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
16
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
17
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
18
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
19
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
20
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

पाटचरीचे खोदकाम सदोष

By admin | Updated: May 21, 2016 02:09 IST

येथील वेणुबाई शंकरराव बेलवे यांच्या शेतातून केलेल्या पाटचरीचे खोदकाम सदोषरीत्या केले आहे.

वाहिपेरीच्या अडचणी वाढल्या : मोक्का पाहणी करण्याची मागणीरोहणा : येथील वेणुबाई शंकरराव बेलवे यांच्या शेतातून केलेल्या पाटचरीचे खोदकाम सदोषरीत्या केले आहे. त्यामुळे या महिला शेतकऱ्याची बरीच जमीन गेली. उरलेली शेतीत वाहीपेरीच्या अडचणी वाढल्या असून ओलीत शक्य नाही. त्यामुळे संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांनी व लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष खोदकाम पाहून आपल्याला न्याय देण्याची मागणी सदर शेतकऱ्याने केली आहे. वेणुबाई शंकरराव बेलगे यांचे वाई मौज्यात ००.९१ हेक्टर आराजीचे सर्व्हे नं. १६१ असे शेत आहे. सदर शेत रोहणा उपलघुकालव्याला लागून उजव्या भागाला आहे. पाटबंधारे विभागाने उपलघु कालव्यातील पाणी सिंचनासाठी वापरता यावे म्हणून त्यांच्या शेताच्या मध्यभागातून पाटचरी खोदली आहे. पाटचरीद्वारे पाणी शेतात नेण्यासाठी शेतजमीन सखल भागात असणे आवश्यक असते. पाटचरी उथळ भागात असेल तर पाणी शेतात नेता येणे शक्य असते. ही बाब माहिती असूनही बेलगे यांच्या शेतातील पाटचरी शेत जमिनीपासून सहा ते सात फूट खोल खोदण्यात आली. त्यामुळे पाटचरीतून येणारे पाणी शेताच्या उंचीपर्यंत वर कसे चढेल हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. सदर खोदकामामुळे अल्पभूधारक शेतकऱ्याच्या शेताचे दोन तुकडे पडले. खोदलेली माती बाजुला टाकल्याने रस्त्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. सदर शेतातून आधी उपकालव्यासाठी व आता पाटचरी साठी जमीन संपादित केल्यामुळे उरलेल्या अत्यल्प जमिनीतून यंदाच्या खरीप हंगामात कसे पीक घ्यावे हा गहन प्रश्न महिला शेतकरी व त्यांच्या मुलांसमोर निर्माण झाला आहे. शेतजमीन संपादनासाठी होणारा खर्च व एवढा खटाटोप करूनही सिंचन शुन्य असा प्रकार येथे पाहावयास मिळत आहे. पाटबंधारे विभागाचे काम प्रत्यक्ष मोक्यावर पाहावे अशी मागणी सदर शेतकऱ्यांचे निम्न वर्धा कालवे विभाग पिपरी (वर्धा) चे कार्यकारी अभियंता, खासदर रामदास तडस, आमदार अमर काळे जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना लेखी निवेदनाद्वारे केली आहे. आपल्याला न्याय मिळावा अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.(वार्ताहर) शेताच्या मध्यभागातच खोदली पाटचरीवेणूबाई बेलवे यांच्या शेतातून आधी उपकालव्यासाठी जमीन संपादित करण्यात आली आहे. यानंतर आता पुन्हा पाटचरी साठी जमीन संपादित केल्यामुळे अत्यल्प जमीन त्यांच्याकडे उरली आहे. या उरलेल्या जमिनीतून कसे पीक घ्यावे हा प्रश्न त्यांना पडला आहे. सिचनासाठी एवढा खटाटोप केल्यावरही सिंचन किती होते हा प्रश्नच असल्याचे बेलवे यांचे म्हणणे आहे. शेताच्या मधातूनच उपकालवा गेल्यामुळे अनेक अडचणी येत आहे.