शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
3
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
4
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
5
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
6
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
7
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
8
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
9
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
10
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
11
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
12
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
13
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
14
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
15
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
16
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
17
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
18
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
19
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
20
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
Daily Top 2Weekly Top 5

खाकीतील सावित्रींचे सौभाग्यासाठी साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 05:00 IST

सतत २४ तास सेवा देणाऱ्या पोलीस विभागातील महिला पोलीस कर्मचाऱ्यांना यंदाच्या कोरोना संकटात वटपौर्णिमेचे औचित्य साधून पतीव्रता धर्माचे पालन करणे थोडे कठीण होते. पण त्यावरही मात करून पहिले कर्तव्य आणि त्याच बरोबर रुढीपरंपरेनुसार पतीव्रता धर्माचे पालन आज शहर पोलीस ठाण्यातील महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी केले.

ठळक मुद्देकोरोना संकटात कर्तव्यासह निभविला पतीव्रता धर्म : निरोगी आरोग्यासाठी प्रार्थना

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोना संकट काळात वटपौर्णिमेचे औचित्य साधून आपल्या कर्तव्यासह पतीव्रता धर्माचे पालन शुक्रवारी शहर पोलीस ठाण्यातील महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी केले. याप्रसंगी महिलापोलिसांनी खाकी वर्दी परिधान करून कोरोनाचे संकट जाऊ दे तसेच माझ्या पतीला दीर्घ आयुष्य लाभू दे, असे साकडेच वटवृक्षाला घातले.सध्या देशासह जगातील विविध देश कोरोना संकटाशी लढा देत आहे. अशातच कोविड योद्धा म्हणून पोलीस प्रशासनातील अधिकारी व कर्मचारीही सेवा देत आहेत. सतत २४ तास सेवा देणाऱ्या पोलीस विभागातील महिला पोलीस कर्मचाऱ्यांना यंदाच्या कोरोना संकटात वटपौर्णिमेचे औचित्य साधून पतीव्रता धर्माचे पालन करणे थोडे कठीण होते. पण त्यावरही मात करून पहिले कर्तव्य आणि त्याच बरोबर रुढीपरंपरेनुसार पतीव्रता धर्माचे पालन आज शहर पोलीस ठाण्यातील महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी केले. शहर पोलीस ठाण्यातील महिला पोलीस कर्मचारी ज्योती देवकुळे, अलका टिपले, संगीता तामगाडगे, प्रिती ढेपे, रंजिता कोडापे यांच्यासह गृहरक्षक दलातील रेखा नैताम, शुभांगी मेश्राम, सोनम निकुडे यांनी शुक्रवारी शहर पोलीस ठाण्याच्या आवारातील वटवृक्षाचे पूजन केले.कर्तव्यही गरजेचेच - टिपलेप्रत्येक वर्षी आम्ही वटपौर्णिमेचे औचित्य साधून घरी वटवृक्षाचे पूजन करीत होतो. परंतु, यंदा कोरोना संकटामुळे आम्हाला सलग २४ तासही कर्तव्य बजावावे लागत आहे. खाकी परिधान केल्यावर आम्ही कर्तव्याला प्राधान्य देतोच. कोरोनाच्या संकटात कर्तव्याला प्राधान्य देऊन आम्ही आज रुढीपरंपरेनुसार भारतीय नारी म्हणून वटवृक्षाचे पूजन केले आहे. खाकीवर्दीत वटपौर्णिमा साजरी करताना आम्हाला एकप्रकारे गर्वच वाटत आहे, असे शहर पोलीस ठाण्यातील महिला पोलीस कर्मचारी अलका टिपले यांनी सांगितले.

टॅग्स :PoliceपोलिसWomenमहिला