शहरं
Join us  
Trending Stories
1
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
2
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
3
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
4
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
5
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
6
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
7
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
8
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
9
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
10
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
11
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
12
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
13
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
14
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
15
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
16
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
17
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
18
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
19
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
20
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

खासगी शाळांकडून होतेय पालकांची लूट

By admin | Updated: June 13, 2015 02:15 IST

खासगी शाळांत वेगवेगळ्या नावाखाली शुल्क आकारून पालकांची आर्थिक लूट केली जात आहे. यामुळे आता ग्रामीण पालक जि.प. शाळांकडे वळल्याचे दिसते.

आकोली : खासगी शाळांत वेगवेगळ्या नावाखाली शुल्क आकारून पालकांची आर्थिक लूट केली जात आहे. यामुळे आता ग्रामीण पालक जि.प. शाळांकडे वळल्याचे दिसते. मागील पाच ते सहा वर्षांपासून ग्रामीण पालकांमध्ये कॉन्व्हेंटचे वेड होते. जि.प. शाळांचा खालावलेला शैक्षणिक दर्जा, शिक्षकांतील राजकीय स्पर्धा व त्यातून विद्यार्जनाकडे होणारे दुर्लक्ष हे त्यामागील कारणे होती. पालक जि.प. शाळेपासून दुरावले होते. परिणामी, जि.प. शाळांना गळती लागली होती; पण आता हळूहळू जि.प. शाळांना सुगीचे दिवस येत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. कॉन्व्हेंट संस्कृती रूजेपर्यंत त्या शाळांनी शुल्क आवाक्यात ठेवले होते; पण कॉन्व्हेंट संस्कृती रूजताच पालक झुंडीने कॉन्व्हेंटमध्ये प्रवेश घ्यायला लागले, शाळा व्यवस्थापकांनी आपले खरे रूप पूढे केले. पूर्वी आवाक्यात असणारे शाळांचे शुल्क वाढविण्यात आले. प्रवेश फी, प्रवासभाडे यात वाढ करण्यात आली. वह्या पुस्तके शाळेतून घेणे बंधनकारक केले. टी-शर्ट सारखी वस्तूही बाहेरून खरेदी न आम्ही म्हणतो त्याच भावात खरेदी करा, हा अट्टहास आल्याने पालकांत नाराजी पसरली आहे. प्रारंभी मृगजळ ठरलेले कॉन्व्हेंट पालकांना आता ओझे वाटत आहे. यामुळे या सत्रात अनेक पालकांनी कॉन्व्हेटमध्ये पाल्यांचा प्रवेश निश्चित केला नसल्याने जि.प. शाळांची पटसंख्या वाढण्याची चिन्हे बळावली आहेत.(वार्ताहर)