शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
4
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
5
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
6
Mumbai: धारावीच्या ‘नॉन स्लम’ बिल्डिंगमधील रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर
7
Menstrual Health: अंगावर पांढरे पाणी जाते, सतत ओल आणि खाज? ५ घरगुती उपाय, त्रास अंगावर काढू नका...
8
IPL 2026: संजू सॅमसनच्या शतकाचे शशी थरूर यांच्याकडून इंग्रजी कवितेतून कौतुक, वाचा मराठी अर्थ
9
इराणने ट्रम्प यांना दाखवला भारताचा स्वर्ग! हिंदीत झापले, म्हणाले, 'बकवास बंद करें, इंडिया आकर देखें'"
10
"तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव
11
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
12
मराठीच्या अनिवार्यतेसाठी सरकारचं निर्णायक पाऊल; वाहनचालकांसाठीच्या ‘या’ नियमांत करणार मोठे बदल 
13
मुंबईसह राज्यात फक्त आठ महिन्यांत २० हजार एक्स्टसी गोळ्यांची विक्री
14
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
15
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
16
काळाचा क्रूर घाला! लग्नाचा वाढदिवस साजरा केला अन् दोनच दिवसांत सुखी संसाराचा डाव उधळला
17
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
18
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
19
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
20
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

चार वर्षात केवळ दोन तक्रारी

By admin | Updated: February 8, 2015 23:37 IST

आई वडिलांना रस्त्यावर आणणाऱ्या पोटच्या मुलांविरूद्ध दाद मागता यावी यासाठी ज्येष्ठ नागरिक निर्वाह न्यायाधिकरण स्थापन करण्यात आले. जिल्ह्यात मात्र ज्येष्ठांना या न्यायाधिकरणाची माहितीच

ज्येष्ठ नागरिक निर्वाह न्यायाधिकरण : हिंगणघाट वगळता कुठेही तक्रार नाहीपराग मगर - वर्धाआई वडिलांना रस्त्यावर आणणाऱ्या पोटच्या मुलांविरूद्ध दाद मागता यावी यासाठी ज्येष्ठ नागरिक निर्वाह न्यायाधिकरण स्थापन करण्यात आले. जिल्ह्यात मात्र ज्येष्ठांना या न्यायाधिकरणाची माहितीच नसल्याचे समोर आले आहे. हिंगणघाट उपविभाग वगळता इतर कुठेही या प्रकारातील तक्रारी दाखल नाहीत. या न्यायाधिकरणाची माहिती सर्वसामान्यांना व्हावी याकरिता शासनाच्यावतीने जनजागृती करणे गरजेचे झाले आहे. गत काही वर्षांत कुटुंबांचे विभक्तीकरण मोठ्या प्रमाणावर झाले आहे. मुलांचे आयुष्य स्थीरस्थावर व्हावे यासाठी प्रयत्नशील असलेल्या पालकांनाच मुले रस्त्यावर आणत आहेत. आई-वडिलांना वाऱ्यावर सोडणाऱ्या मुलांच्या मुजोरीला वेसण घालण्यासाठी शासनाने ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी व चरितार्थासाठी ज्येष्ठ नागरिक निर्वाह अधिनियम २०१० पारित केला. यातून जन्मदात्याचे पालनपोषण करण्याची जबाबदारी वारस किंवा अपत्यांवर सोपविली आहे. वृद्धापकाळात सांभाळ करण्यास नकार व निर्वाह भत्ता न दिल्यास ज्येष्ठ नागरिकांना या निर्वाह न्यायाधिकरणाकडे दाद मागता येते. जिल्ह्यातील वर्धा, आर्वी आणि हिंगणघाट या उपविभागात न्यायाधिकरण स्थापन करण्यात आले. त्याचे अध्यक्ष उपविभागीय अधिकारी आहेत. हिंगणघाट उपविभाग वगळता वर्धा व आर्वी येथे एकही तक्रार आली नसल्याची माहिती आहे. हिंगणघाट उपविभागात दोन तक्रारी दाखल झाल्या असून त्यांचा निकाल लागल्याचे सांगण्यात आले आहे. सर्व जिल्ह्यात न्यायाधिकरणची स्थापना राज्यातील सर्व जिल्ह्यातील उपविभागासाठी न्यायाधिकरण स्थापन केले आहे. पीठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. याबाबतची अधिसूचना राज्य शासनाने २८ सप्टेंबर २०१० ला काढलेली आहे. अपिलासाठी न्यायाधिकरण असून, त्याचे पीठासीन अधिकारी जिल्हा दंडाधिकारी आहेत.