शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

ऑनलाईन शस्त्रविक्रीचा गोरखधंदा जोमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2020 5:00 AM

पोलीस विभाग ऑनलाईन शस्त्र विक्री थांबविणार का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. वर्धा शहरात अल्पवयीन मुलांमध्ये शस्त्रांबाबत विशेष आकर्षण दिसून येते. शाळा, महाविद्यालयस्तरावर अल्पवयीन मुलेही घातक शस्त्रे बाळगून असल्याचे अनेक प्रकार उघडकीस आले आहे. शहरातील टोळ्यांमध्येही वर्चस्वासाठी शस्त्राची जुळवाजुळव सुरू आहे. प्रतिस्पर्ध्यांवर हल्ला करण्याची संधी या टोळ्या शोधत आहे.

ठळक मुद्देहोणार का कारवाई ? : विविध शॉपिंग साईट्सवर सर्रास विक्री

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरासह जिल्ह्यात वर्चस्ववादातून गुन्हेगारी फोफाळली आहे. कोणताही शस्त्र परवाना नसतानासुद्धा गुन्हेगार सर्रास विविध ऑनलाईन शॉपींग साईट्सवरून शस्त्र खरेदी होत आहे. शहरात घडलेल्या गंभीर गुन्ह्यांमध्ये चायनीज चाकूचा वापर झाल्याचे दिसून आले असताना हे चायनीज चाकू येतात कुठून, याची खरेदी कशी होते, हे तपासण्याची गरज आहे. पोलीस विभाग ऑनलाईन शस्त्र विक्री थांबविणार का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.वर्धा शहरात अल्पवयीन मुलांमध्ये शस्त्रांबाबत विशेष आकर्षण दिसून येते. शाळा, महाविद्यालयस्तरावर अल्पवयीन मुलेही घातक शस्त्रे बाळगून असल्याचे अनेक प्रकार उघडकीस आले आहे. शहरातील टोळ्यांमध्येही वर्चस्वासाठी शस्त्राची जुळवाजुळव सुरू आहे. प्रतिस्पर्ध्यांवर हल्ला करण्याची संधी या टोळ्या शोधत आहे.पोलीस कारवाईपासून वाचण्यासाठी थेट शस्त्रांची ऑनलाईन खरेदी सुरू आहे. दोन वर्षांपूर्वी म्हाडा कॉलनी येथे समीर मेटांगळे याचा खून करण्यात आला होता. मागील वर्षी इतवारा तसेच इंदिरा मार्केट परिसरात झालेल्या खुनाच्या घटनेतही चायनीज चाकू वापरण्यात आल्याचे पोलीस तपासात उघड झाले होते. तसेच इतरही घटनांमध्ये आरोपींनी चायनीज तलवारी, चाकू वापरल्याचे उघड झाले आहे. गुन्हेगारी जगतातील अंतर्गत कुरघोड्या लक्षात घेता काहींनी अवैध शस्त्र विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. ऑनलाईन शस्त्र खरेदी करायचे, आणि ते दुप्पट दरात विक्री करायची, हा व्यवसाय जोरात सुरू आहे. चाकू, तलवार, बिछवे आदींसह विविध प्रकारच्या शस्त्रांची उलाढाल मोठ्या प्रमाणात सुरू आहे.शोभेच्या वस्तू म्हणून तलवार, गुप्ती, जांबिया अशी धारदार शस्त्रे सहजपणे मागविता येतात. याच माध्यमातून शहरात शस्त्रांचा पुरवठा होत असल्याचे पुढे आले आहे. भारतीय कायद्यानुसार अशी शस्त्र मागविता येत नाही. शोभेसाठी विकता येतात. त्याचाही परवाना काढावा लागतो. मात्र, नियमांची पायमल्ली करीत शहरातील गुन्हेगार ऑनलाईनद्वारे घरपोच शस्त्र मागवित असल्याचे दिसून येते. त्यामुळे शहरात घडणाऱ्या विविध गंभीर घटनांमध्ये चायनीज किंवा बटनवाल्या चाकूचा वापर होत असल्याचे दिसून येत आहे. शहरात अनेक युवकांकडून ऑनलाईन शस्त्रं मागविल्या जात असून अशांची यादी तयार करून ऑनलाईन मिळणाऱ्या शस्त्रांवर रोख लावण्याची मागणी युवा परिवर्तन की आवाज संघटनेचे निहाल पांडे, गौरव वानखेडे, सोनू दाते, अक्षय बाळसराफ, विशाल इचपाळे, हेमंत भोसले, तेजस येखंडे यांनी केली आहे.शस्त्र बाळगण्याची ‘क्रेझ’अल्पवयीनांमध्ये वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी शस्त्र बाळगण्याची ‘क्रेझ’ निर्माण झाली आहे. प्रतिस्पर्ध्यांमध्ये वचक निर्माण करण्यासाठी तसेच ‘भाई’गिरीचे भूत चढलेल्यांमध्ये विविध आकर्षित शस्त्रे बळगण्याची भुरळ पडली आहे. अनेकांकडे विनापरवाना पिस्तुल देखील आहेत. पोलिसांनी अशांवर कारवाई करण्याची गरज आहे.

टॅग्स :onlineऑनलाइन