शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

तलाठ्याला कार्यालयाचे वावडे

By admin | Updated: September 13, 2014 02:10 IST

येथील तलाठी गत एक महिन्यापासून स्थानिक कार्यालयात सापडत नसल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे.

रोहणा : येथील तलाठी गत एक महिन्यापासून स्थानिक कार्यालयात सापडत नसल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. शासनाच्या विविध शेती विषयक योजनांसाठी आवश्यक असलेले सात-बारा, व नकाशे शेतकऱ्यांना मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.सविस्तर वृत्त असे की, जेव्हा जावे तेव्हा ग्राम सचिवालयातील तलाठी कार्यालयाला कुलूप लागून राहत असल्याने तलाठ्याकडून मिळणारे दाखले शेतकऱ्यांना वेळेवर मिळत नाही. पूर्वी रोहणा येथील तलाठी आठवड्यात दोन-तीन दिवस कार्यालयात भेटायचे. निदान आठवड्यातील बाजाराच्या दिवशी मंगळवारला हमखास कार्यालयात भेटायचे. त्यामुळे शेतकऱ्यांना सात बारा, आठ अ व शेताचा नकाशा यासारखे दाखले स्थानिक पातळीवर आठवडाभऱ्यात मिळत होते. पण जमीन खरडून गेल्याच्या नुकसान भरपाईत तलाठी कार्यालयाकडून झालेला घोटाळा उघड झाल्यापासून सदर तलाठी कार्यालयात आलेच नाही. परिणामी एक महिन्यापासून सदर कार्यालयाला कुलूप राहते. ते कधी उघडले तर तिथे पटवारी नसून कोतवाल हजर असतो. तो केवळ पटवारीसाहेब आले नाही एवढेच उत्तर देतो. परिणामी शेतकऱ्यांना आवश्यक दाखले वेळेवर मिळत नाही. काही शेतकरी आर्वीला जाऊन दाखले मिळवितात. एकंदरीत आवश्यक दाखल्यासाठी शेतकऱ्यांना भटकंती करावी लागते. रोहणा येथील तलाठ्याप्रमाणे आठवड्यातील दोन-तीन दिवस तरी कार्यालयात बसावे अशी मागणी रोहण्यातील शेतकरी करीत आहे.(वार्ताहर)