शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
2
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
3
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
4
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
5
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
6
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
7
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
8
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
9
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
10
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
11
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
12
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
13
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
14
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
15
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
16
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
17
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
18
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
19
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
20
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
Daily Top 2Weekly Top 5

१५ दिवसांपासून वहिवाट ठप्प; शेतीकामे खोळंबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2020 05:00 IST

परिसरात झालेल्या दमदार पावसाने आलेल्या पुरात डिगडोह ते देवळीकडे जाणारा डांबरी रस्ता खचून गेला. तब्बल १५ दिवसांचा कालावधी उलटला पण, रस्त्याची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे बैलबंडी नेणेही शक्य होत असून संपूर्ण वाहतूक ठप्प झाली आहे. डिगडोह येथील नागरिकांना देवळीच मुख्य बाजारपेठ आहे.

ठळक मुद्देपुराच्या पाण्यात रस्ता गेला वाहून : शेती साहित्य आणण्यासाठी १५ कि.मी.चा मारावा लागतोय फेरा

लोकमत न्यूज नेटवर्कचिकणी (जामणी) : नजीकच्या डिगडोह येथील देवळी मार्गावरील पुलाजवळचा डांबरी रस्ता २६ जून रोजी आलेल्या पुरात वाहून गेला होता. त्यामुळे मागील १५ दिवसांपासून शेतकऱ्यांची वहिवाट ठप्प असून शेतीच्या हंगामात शेतीकामे खोळंबल्याने शेतकऱ्यांत संतापाची लाट उसळली आहे.परिसरात झालेल्या दमदार पावसाने आलेल्या पुरात डिगडोह ते देवळीकडे जाणारा डांबरी रस्ता खचून गेला. तब्बल १५ दिवसांचा कालावधी उलटला पण, रस्त्याची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे बैलबंडी नेणेही शक्य होत असून संपूर्ण वाहतूक ठप्प झाली आहे. डिगडोह येथील नागरिकांना देवळीच मुख्य बाजारपेठ आहे.शेतीपयोगी साहित्य आणायचे असल्यास त्यांनी तीन किमी अंतरासाठी चक्क १५ किमीचे अंतर गाठावे लागत आहे. त्यासाठी वाहनकिराया तिप्पटीने द्यावा लागत असल्याने आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. शेतात जायचे असल्यास चार ते पाच किमीचे अंतर गाठावे लागत आहे.संबंधित विभागाने रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे.लोकप्रतिनिधींच्या सूचनेनंतर प्रशासन उदासीनदेवळी येथून हाकेच्या अंतरावर डिगडोह गाव आहे. तसेच जि.प.उपाध्यांचेही गाव अवघ्या चार किमीवर आहे. खासदार रामदास तडस आणि जि.प.उपाध्यक्षा वैशाली येरावार यांनी खचलेल्या रस्त्याची पाहणी केली होती. पण, आज १५ दिवस उलटून गेले तरीही रस्त्याची दुरुस्ती न झाल्याने शेतकºयांसह नागरिकांमधून शासनाच्या धोरणांविषारी नाराजीचा सूर उमटत आहे.या रस्त्याने दुचाकी काढणेही जिकरीचे झाले आहे. इतकेच नव्हेतर पायदळ चालताना जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे. शेती वाहिसाठी देखील अवघड झाले आहे.- मंगेश येसनखेडे, शेतकरी, डिगडोह.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर