१५ दिवसांपासून वहिवाट ठप्प; शेतीकामे खोळंबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2020 05:00 AM2020-07-09T05:00:00+5:302020-07-09T05:00:03+5:30

परिसरात झालेल्या दमदार पावसाने आलेल्या पुरात डिगडोह ते देवळीकडे जाणारा डांबरी रस्ता खचून गेला. तब्बल १५ दिवसांचा कालावधी उलटला पण, रस्त्याची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे बैलबंडी नेणेही शक्य होत असून संपूर्ण वाहतूक ठप्प झाली आहे. डिगडोह येथील नागरिकांना देवळीच मुख्य बाजारपेठ आहे.

Occupancy halted for 15 days; Agriculture was dug up | १५ दिवसांपासून वहिवाट ठप्प; शेतीकामे खोळंबली

१५ दिवसांपासून वहिवाट ठप्प; शेतीकामे खोळंबली

Next
ठळक मुद्देपुराच्या पाण्यात रस्ता गेला वाहून : शेती साहित्य आणण्यासाठी १५ कि.मी.चा मारावा लागतोय फेरा

लोकमत न्यूज नेटवर्क
चिकणी (जामणी) : नजीकच्या डिगडोह येथील देवळी मार्गावरील पुलाजवळचा डांबरी रस्ता २६ जून रोजी आलेल्या पुरात वाहून गेला होता. त्यामुळे मागील १५ दिवसांपासून शेतकऱ्यांची वहिवाट ठप्प असून शेतीच्या हंगामात शेतीकामे खोळंबल्याने शेतकऱ्यांत संतापाची लाट उसळली आहे.
परिसरात झालेल्या दमदार पावसाने आलेल्या पुरात डिगडोह ते देवळीकडे जाणारा डांबरी रस्ता खचून गेला. तब्बल १५ दिवसांचा कालावधी उलटला पण, रस्त्याची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे बैलबंडी नेणेही शक्य होत असून संपूर्ण वाहतूक ठप्प झाली आहे. डिगडोह येथील नागरिकांना देवळीच मुख्य बाजारपेठ आहे.
शेतीपयोगी साहित्य आणायचे असल्यास त्यांनी तीन किमी अंतरासाठी चक्क १५ किमीचे अंतर गाठावे लागत आहे. त्यासाठी वाहनकिराया तिप्पटीने द्यावा लागत असल्याने आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. शेतात जायचे असल्यास चार ते पाच किमीचे अंतर गाठावे लागत आहे.
संबंधित विभागाने रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे.

लोकप्रतिनिधींच्या सूचनेनंतर प्रशासन उदासीन
देवळी येथून हाकेच्या अंतरावर डिगडोह गाव आहे. तसेच जि.प.उपाध्यांचेही गाव अवघ्या चार किमीवर आहे. खासदार रामदास तडस आणि जि.प.उपाध्यक्षा वैशाली येरावार यांनी खचलेल्या रस्त्याची पाहणी केली होती. पण, आज १५ दिवस उलटून गेले तरीही रस्त्याची दुरुस्ती न झाल्याने शेतकºयांसह नागरिकांमधून शासनाच्या धोरणांविषारी नाराजीचा सूर उमटत आहे.

या रस्त्याने दुचाकी काढणेही जिकरीचे झाले आहे. इतकेच नव्हेतर पायदळ चालताना जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे. शेती वाहिसाठी देखील अवघड झाले आहे.
- मंगेश येसनखेडे, शेतकरी, डिगडोह.

Web Title: Occupancy halted for 15 days; Agriculture was dug up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.