शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

आता सोयाबीन पिकावर पाखरांचे लक्ष

By admin | Updated: September 18, 2014 00:01 IST

अस्मानी संकटांचा सामना करीत मळणीयोग्य स्थितीत आलेल्या सोयाबीनवर पाखरांनी लक्ष केंद्रीत केले आहे़ यामुळे नुकसानीस सामोरे जावे लागत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे़

घोराड : अस्मानी संकटांचा सामना करीत मळणीयोग्य स्थितीत आलेल्या सोयाबीनवर पाखरांनी लक्ष केंद्रीत केले आहे़ यामुळे नुकसानीस सामोरे जावे लागत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे़जून महिन्याच्या अखेरीस व जुलैच्या पहिल्या आठवड्यात ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या पेरण्या केल्या व पावसाने दडी मारलेल्या कालावधीत तुषार सिंचनाने ओलित केले, ते सोयाबीनचे पीक मळणी व कापणीयोग्य झाले आहे़ असे पीक फार कमी शेतांमध्ये असल्याने दाणे भरलेल्या शेंगावर पाखरांनी लक्ष केंद्रीत केले आहे़ यामुळे मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. सकाळच्या प्रहारात पाखरांचे थवेच्या थवे या सोयाबीन पिकावर बसत असून आपल्या पोटाची खळगी भरताना पाहायला मिळत आहे. अशा शेतात सकाळपासून ‘पिंप’ वाजविणारा व्यक्ती राखण करीत असला तरी पाखरांना तो आवाज नित्याचा झाला की काय, तर पाखरे या आवाजाने दुसरीकडे जात नसल्याचे शेतकरी सांगतात़ पाखरे पिकावरून शेतातून गेलेल्या विजेच्या तारावर बसून या शेंगांना लक्ष्य बनवित आहे़ यामुळे अहोरात्र कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना हातात येणाऱ्या नगदी पिकापासून मुकावे लागण्याची वेळ आली आहे़ हा खरीप हंगाम धोक्याची घंटा वाजवित असल्याचेच यावरून दिसते़सोयाबीनची दुबार, तिबार पेरणी झाल्याने एकाच वेळी सर्व शेतात सुगीचा हंगाम आला नाही़ यामुळे असे घडत आहे. आधी रानडुक्कर व रोह्यांच्या कळपाने उभ्या पिकात थैमान घातल्याने बळीराजा मेटाकुटीस आला़ आता पीक मळणीयोग्य असताना पाखरांनी हल्ला केल्याने सोयाबीनच संकटात आले आहे़ यामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे़(वार्ताहर)