शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

सवारी नाही, पैसेही संपले, सांगा कुटुंब चालवू तरी कसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 05:00 IST

लॉकडाऊन असल्याने ई-रिक्षामुळे मध्यमवर्गीयसोबतच गरिबांची परिस्थिती दयनीय झाली असून त्यांच्यावर उपासमारीचे संकट उभे ठाकले आहे. रिक्षाचालक शेख बसिर शेख कादीर यांनी सांगितले की, तीन दिवसांपासून बसस्थानक परिसरात रिक्षा लावला. पण, एकही सवारी न मिळाल्याने रिकाम्या हाताते घरी जातो, पैसेच नसल्याने तीन मुली व पत्नी यांचे पोषण कसे कारावे याच चिंतेत आहो.

ठळक मुद्देव्यथा रिक्षाचालकांची : उपासमारीचे संकट गडद, पाणावलेल्या डोळ्यांनी रिकाम्या हाताने घरी जाण्याची आली वेळ

पुरूषोत्तम नागपुरे।लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : तीन दिवसांपासून रिक्षा उभा आहे...एकही सवारी नाही... १० रुपयेही घरी नेऊ शकत नाही...पैसेच नसल्याने पत्नी, मुलांचे शिक्षण...घर खर्च कसा चालवू...अशी व्यथा पाणावलेल्या डोळ्यांनी रिक्षाचालक मांडत आहेत.लॉकडाऊन असल्याने ई-रिक्षामुळे मध्यमवर्गीयसोबतच गरिबांची परिस्थिती दयनीय झाली असून त्यांच्यावर उपासमारीचे संकट उभे ठाकले आहे. रिक्षाचालक शेख बसिर शेख कादीर यांनी सांगितले की, तीन दिवसांपासून बसस्थानक परिसरात रिक्षा लावला. पण, एकही सवारी न मिळाल्याने रिकाम्या हाताते घरी जातो, पैसेच नसल्याने तीन मुली व पत्नी यांचे पोषण कसे कारावे याच चिंतेत आहो. एकही पैसा मिळत नसल्याने संसाराचा गाडा कसा हाकावा, असा प्रश्न पडल्याचे त्यांनी सांगितले. सवारी अभावी सायकल रिक्षाचालकांवर आधीच अवकळा आली आहे. काही सवारी आल्याच तर ई-रिक्षावाले त्या अर्ध्या पैशात घेऊन जातात. दोन महिने उलटले परिस्थितीत जैसे थेच आहे. बससेवा बंद असल्याने एकही सवारी मिळत नाही. उद्योगधंदे ठप्प असल्याने कुठे मजुरीही मिळत नाही. सायकल रिक्षाची जागा आता ऑटोरिक्षाने घेतल्याने रिक्षाचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. आर्वी शहर मोठी बाजारपेठ असल्याने ग्राहकांची व व्यापाऱ्यांची वर्दळ असते. रिक्षाचालकांना देखील चांगला रोजगार मिळत होता. पूर्वी खेड्यापाड्यातून दही, दूध, ताक तूप घेऊन येणारे गौरी समाजाचे ग्राहक बसस्थानकावर उतरायचे व रिक्षात बसून सोडून देताना ते स्व:खुशीने २० ते ३० रुपये देत होते. पण, लॉकडाऊनमुळे त्यांचे येणे बंद झाल्याने आमच्यावर उपासमारीची वेळ आल्याचे रिक्षाचालकांनी लोकमतशी बोलताना सांगितले.कोरोनामुळे उदरनिर्वाह करणे झाले कठीणशहरातील विविध भागात जाण्याकरीता रिक्षाचालक २० ते ४० रुपयांपर्यंत दर आकरत असल्याने सुमारे दोनशे ते तीनशे रुपये उत्पन्न मिळत होते. पण, सध्या लॉकडाऊन असल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा ठाकला आहे. बसस्थानकातून शहरातील विविध ठिकाणी जाण्याकरता प्रवासी मिळत होते ते आता ई-रिक्षा व ऑटोरिक्षाचालक घेऊन जात असल्याने रिक्षाचालकांला प्रवासी मिळणे कठीण झालेले आहे.गेल्या ४४ वर्षांपासून रिक्षाचालकांवर अशी स्थिती कधीच ओढावली नाही. लॉकडाऊनमुळे कुटुंबाचा गाडा कसा हाकावा ही चिंता आहे. बसस्थानक परिसरातून एकही सवारी मिळत नाही. आम्ही ऊल्हापूर नाक्याचे चाळीस रुपये घेत होतो. पण, पण, त्याच सवारीला ऑटो रिक्षाचालक वीस रुपयांत घेऊन जात असल्याने नागरिकांनीही सायकलरिक्षाकडे पाठ फिरविली आहे.शेख बसिर शेख कादीर, रिक्षाचालक

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या