शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ चिमुकलीवर अतिप्रसंग झाल्याचे निष्पन्न

By admin | Updated: October 4, 2014 23:30 IST

खेळत असलेल्या आठ वर्षीय चिमुकलीला एका तरुणाने खुल्या मैदानात नेऊन तिच्यावर अतिप्रसंग केला़ ही बाब वैद्यकीय तपासात निष्पन्न झाली आहे. या प्रकरणात आरोपीची न्यायालयीन कोठडीत

आरोपीस एमसीआर : बलात्कार प्रकरणात वाढवर्धा : खेळत असलेल्या आठ वर्षीय चिमुकलीला एका तरुणाने खुल्या मैदानात नेऊन तिच्यावर अतिप्रसंग केला़ ही बाब वैद्यकीय तपासात निष्पन्न झाली आहे. या प्रकरणात आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.गुरूवारी दि. २ आॅक्टोबरला सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास लहानुजीनगर परिसरात एक आठ वर्षीय चिमुकली मैत्रिणींसोबत खेळत होती. तेथे शेख तौलिब शेख शकिल हा १८ वर्षीय नराधम आला. त्याने त्या चिमुकलीला तुझ्या पप्पाने बोलविले आहे, असे सांगून तिला दुचाकीवर बसवून अग्रगामी शाळेलगत असलेल्या खुल्या जागेत नेले. तेथे तिच्यावर अतिप्रसंग केला. मुलगी घरी परत आली नाही म्हणून घरच्या मंडळींनी तिची सर्वत्र शोधाशोध केली; पण तिचा पत्ता लागत नव्हता. अखेर त्या चिमुकलीसोबत खेळत असलेल्या मुलीची विचारपूस केली असता तिने एका काकाने सोबत नेल्याचे सांगितले. यानंतर घरच्या मंडळींनी त्या दिशेने धाव घेतली असता तो नराधम तिला घेऊन परत येताना दिसला. तो चिमुकलीला सोडून पसार होण्याच्या बेतात असताना चिमुकलीच्या घरच्या मंडळींनी त्याला पकडून शहर पोलिसांच्या हवाली केले. सुरूवातीला त्या युवकाने चिमुकलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न केला असावा, असा संशय होता; पण वैद्यकीय अहवालात अतिप्रसंग झाल्याची बाब निष्पन्न झाली. या प्रकरणात पोलिसांनी शेख तौलिब शेख शकिल याला न्यायालयात हजर केले होते. यात आरोपीला एक दिवस पोलीस कोठडी ठोठावली. अतिप्रसंग झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला पुन्हा न्यायालयात हजर करून न्यायालयीन कोठडीची मागणी केली. न्यायालयाने ती मान्य केली. प्रकरण गंभीर असताना पोलिसांनी आरोपीस न्यायालयीन कोठडीची मागणी केल्याचा आरोप पिडीताच्या नातलगांनी केला आहे. ठाणेदार मुरलीधर बुराडे म्हणतात, पहिल्यांदा न्यायालयात आरोपीला न्यायालयात नेले असता न्यायालयाने उशिरा न्यायालयात आणल्यावरून फटकारले होते. तेव्हा केवळ एक दिवसाची कोठडी सुनावली. पुन्हा पोलीस कोठडी ठोठावल्यानंतर आम्ही या अनुषंगाने न्यायालयीन कोठडीची मागणी केली. ती न्यायालयाने मान्य केली. प्रकरण गंभीर आहे, या अनुषंगाने सर्व चौकशी पूर्णत्वास नेली आहे. आरोपीविरूद्ध बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याची शिक्षा व्हावी, या दिशेने पोलीस तपास करीत आहे. पूढील तपास पोलीस उपनिरीक्षक ममता सहस्त्रबुद्ध करीत आहेत़(जिल्हा प्रतिनिधी)