शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! बच्चू कडू यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण घेतले हाती; "झेंडा बदलला पण अजेंडा नाही.."
2
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
3
सराफा बाजारात सोन्याचा दर किती? दागिने बनवायचे तर..., सोन्या-चांदीच्या किमतींत पुन्हा उसळी...
4
$१ ची किंमत ₹९५.२०: डॉलरच्या समोर रुपया धाराशाही; पहिल्यांदाच विक्रमी नीचांकी स्तरावर भारतीय चलन
5
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
6
‘शिवाजी कोण होता?’ उर्दू आवृत्तीच्या २५ हजारांवर प्रतींची विक्री, पुस्तक पोहोचले पाकिस्तानात
7
९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री! जिच्या नावाने भारताने पाकिस्तानवर डागलेली मिसाईल
8
स्मार्टफोन जगतात मोठी खळबळ: OnePlus आणि Realme चं मर्जर होणार? पाहा डिटेल्स
9
कोल्हापुरी ब्रँड 'प्राडा'ने स्वीकारला, नवीन चप्पल बाजारात; ३० जणांना इटलीत प्रशिक्षणाची संधी
10
अजब लग्नाची गजब कहाणी, ६६ वर्षांच्या आजोबांनी नातीच्या वयाच्या तरुणीसोबत लग्न 
11
भीषण अपघात! "जागाच नव्हती, मजुरांना अक्षरशः कोंबून भरलं"; १६ मजुरांचा मृत्यू; २५ जण जखमी
12
Maharashtra Din 2026 Wishes: महाराष्ट्र आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा मराठमोळा सण
13
Crude Oil Price: कच्च्या तेलाच्या किमतींचा भडका! क्रूड प्रति बॅरल $१२० च्या पार, जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठं संकट
14
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
15
१ मे वैशाख पौर्णिमा: रात्री ९ ते १२ दरम्यान करा 'हा' सोपा उपाय; चंद्र देव पूर्ण करतील सर्व इच्छा!
16
VIDEO: मुंबई इंडियन्सच्या मॅचसाठी विनोद कांबळी वानखेडे स्टेडियमवर, अवस्था पाहून चाहते हळहळले
17
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी; पटापट चेक करा २४K, २२K आणि १८K सोन्याचा भाव
18
"मुलगाच राहिला नाही, तर महाल काय कामाचा?"; अभिनेत्याच्या आईने सोडला ८० कोटींचा बंगला, राहते झोपडीत
19
VIDEO: धडकी भरवणारा अपघात! टायर फुटला, नियंत्रण सुटले अन् १५० फूट खोल दरीत गेली कार
20
लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् खुर्च्यांची फेकाफेक; लग्नात मटणावरून पाहुण्यांमध्ये मोठा राडा
Daily Top 2Weekly Top 5

नववर्षाची अखेर अवकाळी पावसाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 06:00 IST

आर्वी तालुक्यातील देऊरवाडा, नांदपूर, निंबोली, सर्कसपूर, वाठोडा, वागदा, अहिवारडासह इतर गावात चणा पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव असल्याचे दिसून येत आहे. तर गारठ्यामुळे नागरिकही हैराण झाले आहेत. सेलू तालुक्यात थंडीची लाट कायम असताना मंगळवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घोराडसह परिसरात अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या.

ठळक मुद्देकोसळल्या सरी : ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतित

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : यंदाच्या वर्षी सुरुवातीला पावसाने हुलकावणी दिली. परंतु, त्यानंतर झालेल्या सततच्या पावसामुळे शेतकरी मेटाकुटीस आला होता. अशातच सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडचा घास परतीच्या पावसाने हिरावून घेतला. तर आता चणा, तूर, गहू आणि कपाशी पिकावर भिस्त असताना मागील काही दिवसांपासून ढगाळी वातावरण कायम आहे. अशातच सरत्या वर्षाच्या अखेरचा दिवस असलेल्या मंगळवारी जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पावसाच्या सरी झाल्या. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या अडचणी भर पडली आहे.वर्धा शहरासह परिसरात मंगळवारी पहाटे अवकाळी पावसाच्या थोड्याफार सरी बरसल्या. आर्वीसह तालुक्यात मध्यरात्री वादळी वाºयासह पावसाने हजेरी लावली. या पावसाचा गहू, चणा, तूर आणि कपाशी पिकाला फटका बसला आहे. तर सततच्या ढगाळी वातावरणामुळे उभ्या पिकांवर किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. तर चणा पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याचे शेतकरी सांगतात.आर्वी तालुक्यातील देऊरवाडा, नांदपूर, निंबोली, सर्कसपूर, वाठोडा, वागदा, अहिवारडासह इतर गावात चणा पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव असल्याचे दिसून येत आहे. तर गारठ्यामुळे नागरिकही हैराण झाले आहेत. सेलू तालुक्यात थंडीची लाट कायम असताना मंगळवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घोराडसह परिसरात अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या.सध्या कापूस वेचणीच्या कामाला कापूस उत्पादक शेतकºयांकडून गती दिली जात आहे. दुपारी १ वाजताच्या सुमारास अचानक आलेल्या पावसामुळे शेतात कापूस वेचणाºया मजुरांनीही घरचा रस्ता धरला. अचानक आलेल्या पावसामुळे बोंडातून बाहेर आलेला कापूस ओला झाल्याने कपाशी उत्पादकांना फटकाच सहन करावा लागणार आहे. 

टॅग्स :Rainपाऊस