शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
4
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
5
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
6
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
7
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
8
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
9
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
10
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
11
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
12
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
13
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
15
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
16
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
17
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
18
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
19
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
20
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
Daily Top 2Weekly Top 5

नवीन रेल्वेलाईनमुळे वाहतुकीचा भार हलका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2019 06:00 IST

वर्धा ते बल्लारशाह तिसऱ्या मार्गाचे काम प्रगतिपथावर असून या प्रकल्पातील वर्धा ते सोनेगाव १३ किलोमीटरच्या तिसऱ्या नवीन रेल्वेलाईनचा लोकार्पण सोहळा बुधवारी आचार्य विनोबा भावे यांच्या जयंतीदिनी सेवाग्राम रेल्वेस्थानकावर आयोजित होता. यावेळी खासदार रामदास तडस यांनी रेल्वे मालगाडीला हिरवी झेंडी दाखवून नवीन रेल्वेलाईनवर मालगाडीला रवाना केले.

ठळक मुद्देरामदास तडस : वर्धा ते सोनेगावपर्यंतच्या तिसऱ्या लाईनचे लोकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : रेल्वेची वाढलेली वाहतूक लक्षात घेता भारत सरकारने २०१६ मध्ये वर्धा ते बल्लारशाह या तिसºया नवीन रेल्वेलाईनच्या कार्याला मंजुरी प्रदान केली. आज वर्धा-चितोडा-सोनेगाव या १३ किलोमीटर लांबीच्या कार्याचा लोकार्पण पार पडल्याने या मार्गावरील वाहतुकीवरचा ताण निश्चितच कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास खासदार रामदास तडस यांनी व्यक्त केला.वर्धा ते बल्लारशाह तिसऱ्या मार्गाचे काम प्रगतिपथावर असून या प्रकल्पातील वर्धा ते सोनेगाव १३ किलोमीटरच्या तिसऱ्या नवीन रेल्वेलाईनचा लोकार्पण सोहळा बुधवारी आचार्य विनोबा भावे यांच्या जयंतीदिनी सेवाग्राम रेल्वेस्थानकावर आयोजित होता. यावेळी खासदार रामदास तडस यांनी रेल्वे मालगाडीला हिरवी झेंडी दाखवून नवीन रेल्वेलाईनवर मालगाडीला रवाना केले. प्रवासी व उद्योजक मोठ्या प्रमाणावर नवीन रेल्वे प्रारंभ करण्याकरिता विनंती करतात. रेल्वेचा प्रवास अत्यंत कमी खर्चाचा, आरामदायी व सुरक्षित असल्याने प्रवाशांचा रेल्वेवर विश्वास आहे. वर्धा ते बल्लारशाह नवीन रेल्वेलाईनमुळे भविष्यात रेल्वे सुविधांचा विस्तार करणे सहज शक्य होईल. येणाऱ्या काळात वर्धा लोकसभा क्षेत्रातील सर्व रेल्वेस्थानक वायफाय सुविधेने जोडले जातील व आजच्या डिजिटल इंडिया युगामध्ये प्रवासीवर्गाला या सुविधेचा लाभ मिळेल, असेही खा. तडस म्हणाले. याच कार्यक्रमादरम्यान सेवाग्राम रेल्वेस्थानकावर मोफत वायफाय सुविधाही सुरू करण्यात आली. या कार्यक्रमाला माजी खासदार सुरेश वाघमारे, जलतज्ज्ञ माधव कोटस्थाने, मदनसिंग चावरे, मध्य रेल्वेचे वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक पाटील, प्रणव जोशी, मध्य रेल्वेचे मुख्य अभियंता कावरे, वाणिज्य निरीक्षक अजय पुनवटकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :railwayरेल्वेRamdas Tadasरामदास तडस