शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

कौटुंबिक हिंसाचार टाळण्यासाठी पुढाकाराची गरज

By admin | Updated: July 27, 2014 00:14 IST

कौटुंबिक हिंसाचार टाळण्यासाठी मानसिकता बदलणे आवश्यक आहे. स्त्री-पुरूष समानता ही काळाची गरज आहे. त्यासाठी सर्वांनीच पुढाकार घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक

वर्धा : कौटुंबिक हिंसाचार टाळण्यासाठी मानसिकता बदलणे आवश्यक आहे. स्त्री-पुरूष समानता ही काळाची गरज आहे. त्यासाठी सर्वांनीच पुढाकार घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांनी केले.पोलीस मुख्यालयातील आशीर्वाद भवन येथे पुनर्भेट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. महिला व मुलांकरिता असलेल्या सहायता कक्षाला ३० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल कक्ष आणि पोलीस अधीक्षक कार्यालयातर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी महिला कक्षाच्या नागपूर आणि नांदेड विभागाच्या विभागीय समन्वयक प्रतीभा गजभिये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मिलिंद सोनोने, जिल्हा व सत्र न्यायालयातील बार असोसिएशनच्या अध्यक्ष अ‍ॅड. अरुणा खरे, मानसोपचार तज्ज्ञ डॉ. प्रकाश बेहरे, डॉ. कासारे, डॉ. खैरकार आदी उपस्थित होते. यावेळी ‘महिलांबाबत फौजदारी कायद्यात पोलिसांसमोरील आव्हाने’ या विषयावर परिसंवादाचे आयोजनही करण्यात आले़ याबाबत मार्गदर्शन करताना पारस्कर यांनी महिला व मुलांच्या समस्या सोडविण्यासाठी पोलिसांनी संवेदनशील राहून त्यांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य देण्याची गरज प्रतिपादीत केली़ अ‍ॅड. खरे यांनी महिला अत्याचार व संबंधित फौजदारी कायदे, सुधारणा २०१३ विषयावर मार्गदर्शन केले. महिलांचे मानसिक स्वास्थ व संबंधित महिला हिंसाचार विषयावर मानसोपचार तज्ज्ञ डॉ़ बेहरे यांनी मार्गदर्शन केले. डॉ. सोनोने, डॉ. कासारे, डॉ. खैरकार यांनीही महिला सक्षमीकरणावर विचार व्यक्त केले. तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले़ प्रास्ताविक महिला कक्षाच्या विभागीय समन्वयक गजभिये यांनी केले. संचालन सुनीता झांबरे यांनी केले तर आभार प्रिया हुकमे यांनी मानले. कार्यक्रमाला सुधाकर ढोमणे, विनोद खंडारे, सुरेखा खापर्डे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले़(कार्यालय प्रतिनिधी)