शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

टोळधाड नियंत्रणासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 05:00 IST

टोळघाट ही किड आंतरराष्ट्रीय स्तरावर अतिशय महत्त्वाची आहे. ही किड अंत्यत खादाड आणि मोठ्या प्रमाणात नुकसान करणारी आहे. वाळवंटी टोळ ही किड मोठ्या प्रमाणात उभ्या पिकाचे तसेच इतर वनस्पतीचे नुकसान करते. या किडीच्या दोन अवस्था आहेत. जेव्हा ही किड एकट्या अवस्थेत असते तेव्हा तिला एकाकी अवस्था म्हणतात.

ठळक मुद्देडॉ. प्रशांत उंबरकर, पीक संहारक कीड, प्रभावी उपाययोजना आवश्यक

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : टोळधाड संकट विदर्भात पोहोचले आहे. ही किड खादाड व मोठे नुकसान करणारी असल्याने त्याच्या नियंत्रणासाठी सामूहिक प्रयत्नाची गरज आहे, असे मत सेलसुरा येथील कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. प्रशांत उंबरकर यांनी मांडले आहे.टोळघाट ही किड आंतरराष्ट्रीय स्तरावर अतिशय महत्त्वाची आहे. ही किड अंत्यत खादाड आणि मोठ्या प्रमाणात नुकसान करणारी आहे. वाळवंटी टोळ ही किड मोठ्या प्रमाणात उभ्या पिकाचे तसेच इतर वनस्पतीचे नुकसान करते. या किडीच्या दोन अवस्था आहेत. जेव्हा ही किड एकट्या अवस्थेत असते तेव्हा तिला एकाकी अवस्था म्हणतात. तर जेव्हा ही किड सामूहिक आढळून येते तेव्हा तिला समूह अवस्था म्हणतात. समुह अवस्थेत ही किड आष्टी तालुक्यात आढळून आली आहे. त्यामुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. टोळधाडीची सवय थव्याथव्याने एका दिशेने उडत जाण्याची असते. त्यामुळे पुढे येणाऱ्या थव्याच्या लाटेवर ६० से.मी. रुंद व ७५ सें.मी. खोल चर खोदून त्यात टोळधाडीच्या पिलांना पकडून नष्ट करता येते. दिवसा ही किड शेतात आढळल्यास थाळी, ढोल, ताशा, डब्बे जोरात वाजवावे. जेणेकरून या किडीला शेतातून हाकलून लावता येईल. टोळधाडीची अंडी घातलेली जागा शोधून जमिनीच्या भोवताली चर खोदल्यास पिलांना अटकाव करून नियंत्रण करता येते. सायंकाळी किंवा रात्री झाडांवर टोळ जमा होतात, अशावेळी प्रादुर्भावग्रस्त शेतात मशाली पेटवून धूर केल्यास या किडीवर नियंत्रण मिळविला येते. तर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून निंबोळी आधारित किटकनाशक अझाडिरॅक्टीन १५०० पीपीएम ३० मि.ली. किंवा ५ टक्के निंबोळी अर्क प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. २० किलो गहू किंवा भाताच्या तुसामध्ये फ्रिप्रोनिल ५ एस. पी. ३ मि.ली. मिसळावे. याचे ढिग शेतात वेगवेगळ्या ठिकाणी ठेवावे. याकडे टोळधाड आकर्षित होतात आणि किडनाशकामुळे ते मरतात. मिथिल पॅराथियॉन २ टक्के भुकटी २५ ते ३० किलो प्रतिहेक्टरी धूरळणी करावी, असे डॉ. उंबरकर यांनी सुचविले आहे.

टॅग्स :agricultureशेती