अनैतिक संबंधातून एकाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 05:00 IST2020-04-26T05:00:00+5:302020-04-26T05:00:31+5:30

स्थानिक जयभीम वॉर्ड भागातील मागील परिसरात राहणाऱ्या वसंता आत्राम याच्या घरालगत एका व्यक्तीचा मृतदेह असल्याची माहिती अल्लीपूर पोलिसांना मिळाली. त्यानंतर अल्लीपूरचे ठाणेदार योगेश कामाले, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश बैरागी, जमादार संजय रिठे, संजय वानखेडे, पिसे यांनी तातडीने घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर मृताची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले.

Murder of one in an immoral relationship | अनैतिक संबंधातून एकाची हत्या

अनैतिक संबंधातून एकाची हत्या

ठळक मुद्देआरोपीस अटक । दगडाने केले वार, अल्लीपुरात खळबळ

लोकमत न्यूज नेटवर्क
अल्लीपूर : अनैतिक संबंधातून एकाची हत्या करण्यात आली. या प्रकरणातील आरोपीला स्थानिक पोलिसांनी अटक केली असून ही घटना शनिवारी सकाळी स्थानिक जयभीम वॉर्डात उघडकीस आली. हमीद पठाण (३३) रा. अल्लीपूर, असे मृताचे नाव आहे. आरोपीने क्रूरपणे दगडाने ठेचून त्याला जीवानिशी ठार केल्याचे पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात पुढे आले आहे.
स्थानिक जयभीम वॉर्ड भागातील मागील परिसरात राहणाऱ्या वसंता आत्राम याच्या घरालगत एका व्यक्तीचा मृतदेह असल्याची माहिती अल्लीपूर पोलिसांना मिळाली. त्यानंतर अल्लीपूरचे ठाणेदार योगेश कामाले, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश बैरागी, जमादार संजय रिठे, संजय वानखेडे, पिसे यांनी तातडीने घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर मृताची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले. मृतदेहाची बारकाईने पाहणी केल्यावर मृत हमीद याच्या शरीरावर गंभीर स्वरूपाच्या जखमा आढळून आल्या. हमीद पठाण हा मागील काही वर्षांपासून समुद्रपूर तालुक्यातील एका गावात पत्नीसह राहात होता. परंतु, मुळ गाव असलेल्या अल्लीपुरात त्याचे येणे-जाणे सुरू होते. शुक्रवारी तो अल्लीपूर येथे त्याच्या भावाकडे आला होता. अशातच त्याची हत्या करण्यात आली. या प्रकरणी अल्लीपूर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद घेत तपासाचे चक्रफिरवित संशयित आरोपी म्हणून वसंता आत्राम याला ताब्यात घेतले. पोलिसी हिसका दाखविताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर वसंत आत्रामला याला अल्लीपूर पोलिसांनी अटक केली आहे.

Web Title: Murder of one in an immoral relationship

टॅग्स :Murderखून