शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
3
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
4
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
5
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
6
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
7
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
8
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
9
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
10
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
11
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
12
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
13
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
14
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
15
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
16
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
17
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
18
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
19
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
20
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
Daily Top 2Weekly Top 5

बहीण-भावाच्या मृत्यूमुळे आदर्शनगरात शोककळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2019 05:00 IST

प्राप्त माहितीनुसार, सेवाग्राम येथील आदर्शनगर भागातील रहिवासी असलेला अविनाश गोंडगे व अविनाशची बहीण अनुष्का गोंडगे हे दोघे शेळ्या चारण्यासाठी आदर्शनगरच्या शेजारी असलेल्या अण्णासागर तलाव परिसरात गेले होते. शेळ्या चरण्यासाठी सोडल्यानंतर अनुष्का व अविनाश हे दोघेही तलावाच्या काठावर खेळत असतांना अचानक अविनाशचा तोल जाऊन तो तलावात पडला. अविनाश पाण्यात बुडत असल्याचे लक्षात येताच अनुष्काने आरडा-ओरड करीत त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला.

ठळक मुद्देभावाला वाचविताना बहिणीचा अंत

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : येथील वर्धा मार्गावरील अण्णासागर तलाव परिसरात शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या बहीण-भावाचा तलावात बुडून मृत्यू झाला. सदर दोन्ही मृतक आदर्शनगर येथील रहिवासी असून या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. अविनाश राजेंद्र गोंडगे (१३) व अनुष्का राजेंद्र गोंडगे (१२) दोन्ही रा. आदर्शनगर सेवाग्राम, अशी मृतांची नावे आहेत.प्राप्त माहितीनुसार, सेवाग्राम येथील आदर्शनगर भागातील रहिवासी असलेला अविनाश गोंडगे व अविनाशची बहीण अनुष्का गोंडगे हे दोघे शेळ्या चारण्यासाठी आदर्शनगरच्या शेजारी असलेल्या अण्णासागर तलाव परिसरात गेले होते. शेळ्या चरण्यासाठी सोडल्यानंतर अनुष्का व अविनाश हे दोघेही तलावाच्या काठावर खेळत असतांना अचानक अविनाशचा तोल जाऊन तो तलावात पडला. अविनाश पाण्यात बुडत असल्याचे लक्षात येताच अनुष्काने आरडा-ओरड करीत त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला.अशात तीही तलावात पडली. दरम्यान, घटनास्थळी पोहोचलेल्या काही नागरिकांनी अनुष्काला तलावाबाहेर काढले. गंभीर प्रकृती असलेल्या अनुष्काला तातडीने सेवाग्राम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती तिला मृत घोषित केले. माहिती मिळताच सेवाग्राम पोलीस स्टेशनचे ठाणेदार कांचन पांडे, एएसआय प्रमोद बोंडसे, मनोज नेपटे, सुधीर लडके, अमोल जिंदे यांनी तातडीने घटनास्थळ गाठले.घटनास्थळी पोहोचलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी पोहण्यात तरबेज असलेल्या व्यक्तींच्या सहकार्याने अविनाशचा मृतदेह तलावाबाहेर काढला.पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सेवाग्राम येथील रुग्णालयात पाठविला. घटनेची सेवाग्राम पोलिसांनी नोंद घेतली आहे. अगदी दिवाळीच्या सणादरम्यान ही घटना घडल्याने आदर्शनगरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.घटनास्थळी आढळली सायकलघटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी परिसराची बारकाईने पाहणी केली असता तलावाच्या काठावर एक छोटी सायकल आढळून आली. ती पोलिसांनी ताब्यात घेतली असून ही सायकल अविनाशने तेथे आणली असावी, असा अंदाज पोलिसांकडून वर्तविला जात आहे. पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :Accidentअपघात