मोकाट जनावरांनी नागरिकांना धरले वेठीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2020 05:00 AM2020-08-03T05:00:00+5:302020-08-03T05:00:12+5:30

पावसाळ्याला सुरुवात होताच शहरातील विविध रस्त्यांवर आणि विविध भागात ठाण मांडून बसतात. यामुळे रहदारीला अडथळा निर्माण झाला असून असुरक्षित झाली आहे. बहुतांशवेळी या जनावरांत टकराही होतात. त्यामुळे मोठ्या अपघाताची शक्यता आहे. मानस मंदिर परिसरात दहा-बारा मोकाट जनावरांच्या कळपाचा मागील काही दिवसांपासून वावर आहे.

Mokat animals grabbed the citizens | मोकाट जनावरांनी नागरिकांना धरले वेठीस

मोकाट जनावरांनी नागरिकांना धरले वेठीस

Next
ठळक मुद्देप्रमुख मार्ग, मानस मंदिर परिसर : गोपालकांवर दंडात्मक कारवाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : मोकाट जनावरांनी मानस मंदिर मागील काही दिवसांपासून प्रचंड उच्छाद घातला आहे. यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. मोकाट जनावरांचा बंदोबस्त करीत संबंधित गोपालकांवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी परिसरातील रहिवासी नागरिकांनी केली आहे.
पावसाळ्याला सुरुवात होताच शहरातील विविध रस्त्यांवर आणि विविध भागात ठाण मांडून बसतात. यामुळे रहदारीला अडथळा निर्माण झाला असून असुरक्षित झाली आहे. बहुतांशवेळी या जनावरांत टकराही होतात. त्यामुळे मोठ्या अपघाताची शक्यता आहे. मानस मंदिर परिसरात दहा-बारा मोकाट जनावरांच्या कळपाचा मागील काही दिवसांपासून वावर आहे. ही जनावरे रहिवासी नागरिकांच्या परसबागेचे नुकसान करीत असून लहान मुले, आबालवृद्धांवर धावून जातात. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. परिसरातील नागरिकांनी मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याकरिता नगरपालिकेकडे तक्रारी केल्या; मात्र कोरोनाचे कारण पुढे करीत वेळ मारून नेली जात आहे. मोकाट जनावरांचा वावर येथील नागरिकांच्या जिवावर उठला आहे. नगरपालिका प्रशासनाने मोकाट जनावरांचा बंदोबस्त करीत संबंधित गोपालकांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी गंगाधरराव जगताप, मनीष जगताप, राजाभाऊ देशमुख यांनी केली आहे.

मुख्य मार्गावर जनावरांचा ठिय्या
शहरातील बाजारपेठेकडे जाणाऱ्या एकमेव प्रमुख मार्गावर मागील काही महिन्यांपासून मोकाट जनावरांचा मुक्त संचार आहे. ही जनावरे रस्त्याच्या मधोमध उभी राहत असल्यान रहदारीला अडथळा निर्माण होत असून मोठ्या अपघाताचीही शक्यता आहे. नगरपालिकेचे या समस्येकडे अक्षम्य दुर्लक्ष आहे.

Web Title: Mokat animals grabbed the citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.