शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

मतदार जागृतीसाठी ‘मोबाईल व्हॅन’

By admin | Updated: October 1, 2014 23:28 IST

विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी, मतदान नि:पक्षपाती व कुठल्याही दबावाला बळी न पडता व्हावे यासाठी निवडणूक आयोग विविध उपाययोजना करीत आहे़ आता मतदारांना मतदानासाठी

सुरेंद्र डाफ - आर्वीविधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी, मतदान नि:पक्षपाती व कुठल्याही दबावाला बळी न पडता व्हावे यासाठी निवडणूक आयोग विविध उपाययोजना करीत आहे़ आता मतदारांना मतदानासाठी प्रेरित करण्याकरिता आर्वी विधानसभा मतदार संघातील गावोगावी ‘मोबाईल व्हॅन’ सेवा सुरू करण्यात आली आहे़ या जनजागृती मोहिमेमुळे मतदान टक्केवारीत वाढ होईल, अशी अपेक्षा बाळगली जात आहे़ निवडणूक निर्वाचन आयोगाने २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी व मतदान करण्यासाठी मतदारांनी स्वयंस्फूर्तपणे समोर येऊन आपला योग्य उमेदवार निवडावा तसेच मतदानाचा हक्क बजावला जावा, यासाठी आर्वी विधानसभा क्षेत्रातील गावोगावी मोबाईल व्हॅन सेवा सुरू आहे़ यावर्षी मतदारांना जागृत करण्यासाठी प्रथमच २०१४ च्या निवडणुकीत मतदानासाठी प्रचाराचे माध्यम म्हणून याचा वापर होत असून ही मोबाईल व्हॅन सध्या मतदारांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे़ सर्वच उमेदवारांच्यावतीने आपापल्या परीने सामान्य मतदारांना मतदान करण्यासाठी विविध प्रलोभने दाखविली जातात़ यावर निर्बंध घातला यावा व मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून आयोगाने मतदारांत जागृती मोहीम हाती घेतली आहे़ यासाठी शालेय विद्यार्थ्यांची रॅली, पहिल्यांदा मतदान करणाऱ्या युवकांना आर्वीतील गांधी चौकात शपथ देऊन त्या विद्यार्थ्यांनी शहरातील वॉर्डा-वॉर्डात जाऊन मतदारांना मतदान करा, असे आवाहन करून प्रोत्साहित करण्यात येत आहे़ मतदार संघातील प्रत्येक गावात मतदान जागृतीसाठी महसूल विभागाच्यावतीने विशेष व्यवस्था व नियंत्रण पथक तयार करण्यात आले आहे़आर्वी-आष्टी-कारंजा तालुक्यात मतदारांच्या जागृतीसाठी चित्ररथ, मोबाईल व्हॅन सेवा सुरू आहे़ मतदारांनी कुठल्याही प्रलोभनांना बळी न पडता नि:पक्षपातीपणे मतदान करावे, असेही आवाहन करण्यात येत आहे़