शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

वादळात मोबाईलचा वापर धोक्याचा

By admin | Updated: June 11, 2014 00:13 IST

पावसाळ्याला सुरवात झाली आहे. या दिवसात विजा कडाडत असतात. अशावेळी मोबाईलवर चॅटिंग, मोबाईलवर बोलणे शक्यता टाळणे गरजेचे असते. गेल्या वर्षी मोबाईल हाताळताना एका युवकाचा मृत्यू झाला होता.

वायगाव (नि़) : पावसाळ्याला सुरवात झाली आहे. या दिवसात विजा कडाडत असतात. अशावेळी मोबाईलवर चॅटिंग, मोबाईलवर बोलणे शक्यता टाळणे गरजेचे असते. गेल्या वर्षी मोबाईल हाताळताना एका युवकाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे प्रत्येकाने याबाबत काळजी घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी सुनील गाडे यांनी केले आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वीज पडल्याने जीवीत हानी झाल्याच्या अनेक घटना घडत असतात अशा वेळी मोबाईलवर बोलणे टाळायणे गरजेचे आहे. जिल्ह्यात गेल्या वर्षात १३ जणांच्या अंगावार वीज पडून त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती नियंत्रण कक्षाने दिली आहे. जिल्ह्यातील ८ गावामध्ये वीजरोधक यंत्रे लावण्यात आली आहेत. यात सेलू तालुक्यातील येळाकेळी, समुद्रपूर तालुक्यातील लोखंडी, हिंगणघाट निबोली, आष्टी तालुक्यातील साहूर, कारंजा तालुक्यातील राहटी चा सहा गावात वीजरोधक यंत्रे लावण्यात आली आहेत. विजेपासून बचावाकरिता सुरक्षित राहण्याच्या आवाहनाकडे दुर्लक्ष न करता त्याबाबत काळजी घ्यावी असे सांगण्यात आले आहे. वादळ वारा सुरु होताच घरातील संगणक, टीव्ही आदी विद्युत उपकरणे बंद करुन त्यांना विद्युत स्त्रोतापासून वेगळे करणे आवश्यक आहे. तसेच विजा कडाडत असताना मोबाईलवर बोलणे अत्यंत धोक्याचे असते. तसेच घराची दारे व खिडक्या बंद करणेही गरजेचे असते. घराबाहेर असल्यास आकाशात वीज चमकल्यावर मेघ गर्जनांचा आवाज आल्यास त्या ठिकानावरुन ३ ते ४ किलोमिटर परिसरात वीज पडण्याची दाट शक्यता असते. शेतात काम करत असताना पायाखाली लाकूड किंवा कोरडा पाला पाचोळा ठेवणे हितावह असते. तसेच झाडाखाली आश्रय घेणे धोक्याचे असते. कारण झाडाम्वर वीज पडण्याचा धोका जास्त असतो. आपत्ती व्यवस्थापन कक्षेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे अशा वातावरणात काळजी घेण्याचे आवाहनही करण्यात येत आहे.(वार्ताहर)