शहरं
Join us  
Trending Stories
1
तमिळनाडू सत्तासंघर्ष: बहुमताची बेरीज जुळली नाही; विजय याच्या शपथविधीला राज्यपालांचा पुन्हा ब्रेक?
2
भारताचा दणका अन् चीनचा खोटारडेपणा! १ वर्षानंतर चीनने जगासमोर मान्य केलं ऑपरेशन सिंदूरमधील 'ते' सत्य
3
पुन्हा उधारीच्या भरवशावर पाकिस्तान! IMF कडून १.३२ बिलियन डॉलर्सची मदत; पण जनतेचे कंबरडे मोडणार?
4
लेफ्टिनेंट जनरल एन. एस. राजा सुब्रमणी देशाचे नवे CDS, अशी आहे त्यांची कारकीर्द 
5
Dividend Stock: एका शेअरवर ७५ रुपयांचा डिविडंड देतेय 'ही' दिग्गज कंपनी, रेकॉर्ड डेट निश्चित, ब्रोकरेजनं वाढवलं टार्गेट
6
लग्नानंतर २६ वर्षांनी आर. माधवनने सांगितली पुरुषांची 'मन की बात'! पत्नीकडून असतात 'या' अपेक्षा
7
तक्रारींकडे दुर्लक्ष केल्यास ५० लाख दंड! ट्रायचे कठोर पाऊल; नवीन नियमावलीचा मसुदा जाहीर
8
मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण
9
Petrol Diesel Rate: पेट्रोल डिझेलचे दर वाढणार का? सरकारच्या एका निर्णयाचा कंपन्यांना मोठा फटका; महिन्याला होतंय ₹३०००० कोटींचं नुकसान
10
आजचे राशीभविष्य, ०९ मे २०२६: नवीन योजना आखाल, नातेवाईक-मित्रांकडून सुखद बातमी मिळेल! 'असा' जाईल आजचा दिवस 
11
बऱ्याच दिवसांनी दिसला परश्या, पुण्यातील इव्हेंटमध्ये रिंकू-आकाशची हजेरी; नंतर दोघांची धमालमस्ती
12
प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे
13
सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला?
14
तमिळ अस्मिता आणखी ताणू नये! तमिळनाडूच्या सत्तेचा पेच सुटणार का?
15
दहावीतही सावित्रीच्या लेकींचीच बाजी; ९२.०९ टक्के परीक्षेचा निकाल; मुली उत्तीर्ण ९७.६२ टक्के तर मुले ८९.५६ टक्के
16
बेशिस्त IPL, बीसीसीआय आणि खेळाडूंच्या गर्लफ्रेंड्स!
17
वयाची ७४ वर्षे, ७२ देशांची सफर; ब्रिटनच्या 'गिल आजीं'चा एकटीनं जगप्रवास!
18
भूसंपादन घोटाळा : अविनाश पाठकसोबतचे आणखी ३ बडे मासे रडारवर! १५ मेपर्यंत पोलिस कोठडीत मुक्काम
19
वर्षभरात १,०९८ कोटींवर चोरट्यांचा डल्ला; राज्यासाठी ‘एनसीआरबी’चा २०२४ चा धक्कादायक अहवाल
20
रेल्वेचा ‘मेगा’ गोंधळ ! सूचना नाही की घोषणा; सलग दुसऱ्या दिवशी कसारा मार्गाचा खोळंबा; प्रवाशांचा आक्रोश
Daily Top 2Weekly Top 5

तलाठी भरतीत गैरप्रकार, पुरवठा विभागात हप्तेवारी

By admin | Updated: June 3, 2016 02:08 IST

तलाठी पदभरतीमध्ये गैरप्रकार करण्यात आला आहे. स्वस्त धान्य दुकानदारांवर मेहरबानी दाखवित वसुली केली ...

तहसीलदारांवर गंभीर आरोप : मोईच्या सरपंचाची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
आष्टी (शहीद) : तलाठी पदभरतीमध्ये गैरप्रकार करण्यात आला आहे. स्वस्त धान्य दुकानदारांवर मेहरबानी दाखवित वसुली केली जात असल्याचा आरोप मोई येथील सरपंच सुधाकर पवार यांनी केला आहे. याबाबत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. या प्रकरणात काय कार्यवाही होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
निवेदनानुसार, मौजा मुबारकपूर व आबाद (किन्ही) येथील नागरिकांसाठी पुरवठा विभागाने एन.डी. पवार यांना परवाना दिला. त्यांनी योग्यरित्या धान्य पुरवठा केला नाही. एकाच ग्राहकाचे दोन कार्ड तयार करून बेकायदेशीर धान्य उचल केली, असा आरोप पवार यांनी केला आहे. याप्रकरणी तहसीलदारांकडे लेखी तक्रार करूनही कार्यवाही झाली नाही. प्रथमदर्शनी गुन्हा सिद्ध होऊनही पोलिसांत गुन्हा दाखल केला नाही. नवीन कार्ड काढण्याकरिता तहसीलदार गजभिये यांच्याकडे रितसर अर्ज सादर केल्यानंतरही नागरिकांना दोन महिने कार्ड दिले जात नाही. परिणामी, नागरिक धान्यापासून वंचित आहे. तालुक्यात ६० स्वस्त धान्य दुकानदार व ७४ केरोसीन विक्रेते आहे. हे गरजूंना शासकीय मापाप्रमाणे वाटप करीत नाही. याप्रकरणी अनेक तक्रारी केल्या. त्याची दखल घेतली नाही. सरपंच पवार यांनी शासकीय धान्य दुकानदारांकडे चौकशी केली असता सर्व विक्रेत्यांकडून महिन्याकाठी अंदाजे दुकानदार ५०० रुपये व केरोसीन विक्रेते ३०० रुपये, असे ५० हजार रुपये दरमहा उकळतात, असे गंभीर आरोप पवार यांनी केले आहे. आष्टी तहसील कार्यालयांतर्गत रिक्त असलेल्या मौजातील कोतवालाच्या जागा मे महिन्यात भरल्या. यासाठी सुशिक्षीत उमेदवारांनी अर्ज केले होते; पण मंडळ अधिकारी व तलाठी यांच्या परिचयातील उमेदवारांना नियम डावलून नियुक्ती दिली. यात प्रत्येकाकडून ५० हजार ते १ लाख २५ हजार रुपये घेण्यात आले. या नियुक्त्या तहसीलदारांनी केल्याचा आरोपही पवार यांनी केला. कोतवाल भरती मंडळ अधिकारी, पटवारी व राजकीय व्यक्तींच्या वरदहस्ताखाली पैसे घेऊन झाली. शिक्षित, मेहनती व गरजुंना डावलण्यात आले. कोतवाल भरतीची चौकशी करून कार्यवाही करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
याप्रकरणी मुख्यमंत्री, महसूल मंत्री, अन्न नागरी पुरवठा मंत्री, मुख्य सचिव, महसूल आयुक्त यांना लेखी निवेदनाद्वारे रजिस्टर्ड तक्रार करण्यात आली आहे.(प्रतिनिधी)

शेतकऱ्यांच्या नोंदी घेण्यासाठी होते पैशाची मागणी
शेतकऱ्यांच्या शेतात नोंदणी, फेरफार व पीक नोंदीकरिता अर्ज देऊनही मंडळ अधिकारी व पटवारी ४-५ महिने नोंदी रेकॉर्डला घेऊन मंजूर करीत नाही. यामुळे शेतकऱ्यांना शासकीय योजनेचा लाभ घेता येत नाही. एका नोंदीसाठी शेतकऱ्याला २ ते ५ हजार रुपयांची मागणी पटवारी व मंडळ अधिकारी करतात. यामुळे शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोपही निवेदनातून करण्यात आला आहे.

सदर तक्रार हेतुपुरस्पर व द्वेष भावनेतून केली आहे. मी कुणाकडूनही पैसे घेतले नाही. कोतवाल भरती पारदर्शक झाली आहे. कुठल्याही चौकशीला सामोरे जायला तयार आहे.
- सीमा गजभिये, तहसीलदार, आष्टी.

तहसीलदार आष्टी यांच्याबाबत कोतवाल भरती व धान्य पुरवठा गैरप्रकार प्रकरणी तक्रार अद्याप माझ्याकडे प्राप्त झाली नाही. सदर प्रकरण जिल्हाधिकारी यांच्याकडे येते. निवेदन आल्यानंतर चौकशी करण्याचा निर्णय होईल.
- दीपक नलावडे, अप्पर जिल्हाधिकारी, वर्धा.