शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीकरिता बैठक

By admin | Updated: November 13, 2014 23:07 IST

स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीने विदर्भातील अकराही जिल्ह्यात १० ते २० नोव्हेंबर चे दरम्यान कार्यकर्त्यांच्या बैठकी आयोजित केल्या आहेत.

हिंगणघाट : स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीने विदर्भातील अकराही जिल्ह्यात १० ते २० नोव्हेंबर चे दरम्यान कार्यकर्त्यांच्या बैठकी आयोजित केल्या आहेत. याच निमित्ताने येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात बैठक पार पडली.यावेळी आयोजित पत्र परिषदेत माजी आमदार वामन चटप यांनी विदर्भ राज्याच्या मागणीसाठी या समितीचे पहिले राष्ट्रीय अधिवेशन १३ व १४ डिसेंबर २०१४ ला नागपूर येथे आयोजित केल्याची माहिती दिली. या अधिवेशनाला तेलंगणाचे मुख्यमंत्री व लहान राज्याचे पुरस्कर्ते चंद्रशेखर तसेच खासदार पी.ए. संगमा उपस्थित राहणार असल्याची माहिती दिली. विदर्भात जवळपास १०० सभांचे आयोजन करून जनजागृती करणार असल्याचे त्यांनी सांगितले. विदर्भ आंदोलन समितीने आयोजित राष्ट्रीय अधिवेशनात विदर्भ राज्याच्या मागणीचा १०५ वर्षांचा इतिहास, आंदोलन विदर्भाचे शोषण, फोफावलेला नक्षलवाद, कुपोषण, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, सिंचन उद्योग धंद्याचा अनुशेष, बेरोजगारी आदी प्रश्नावर चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे. याप्रसंगी विदर्भराज्य समितीचे रामभाऊ नेवले म्हणाले की, भाजपाने १९९७ च्या भुवनेश्वर अधिवेशनात छोट्या राज्याचा ठराव घेतल्यानंतर अटल वाजपेयींच्या सरकारने उतरांचल, छत्तीसगड, झारखंड राज्याची निर्मिती केली. त्यावेळी या राज्यात मोठे आंदोलन झाले नाही. विदर्भात सतत आंदोलन सुरू असताना विदर्भाची निर्मिती केली नाही. त्यावेळी या राज्यात मोठे आंदोलन झाले नाही. विदर्भात सतत आंदोलन सुरू असताना विदर्भाची निर्मिती केली नाही. नुकत्याच झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भातील जनतेला विदर्भ राज्याचे आश्वासन देवून निवडणूका जिंकल्या आहेत. आता केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार असताना आश्वासनाची पुर्तता आवश्यक असताना भाजपा नेते या प्रश्नावर बोलण्यास टाळाटाळ करीत आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र राज्याचे तुकडे होवू देणार नाही, याची राज्यात ग्वाही देत आहे, असा आरोपही केला. या पत्रपरिषदेला नंदा पराते, गंगाधर मुटे, मधुसूदन हरणे, जिवन गुरनुळे, उल्हास कोंटबकर, अजाब राऊत, डॉ. इसनकर, भाऊराव गाठे यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)