ओबीसींची जातनिहाय जनगणना करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 06:00 AM2020-03-20T06:00:00+5:302020-03-20T06:00:20+5:30

खासदार रामदास तडस यांनी गुरुवारी सपत्नीक नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली. भारतात विविध क्षेत्रातून आपले अमुल्य योगदान देणाऱ्या ओबीसीमधील सर्व प्रवर्गाचे हित लक्षात घेऊन प्रस्तावित २०२१ च्या जनगणनेमध्ये ओबीसींची जातीनिहाय जनगणना करावी.

Make a Census of the OBCs | ओबीसींची जातनिहाय जनगणना करा

ओबीसींची जातनिहाय जनगणना करा

Next
ठळक मुद्देपंतप्रधानांकडे मागणी : रामदास तडस यांनी घेतली सपत्नीक भेट, विविध विषयांवर केली चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : देशातील ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी, वर्धा लोकसभा क्षेत्रातील प्रधानमंत्री आवास योजना शहरी अंतर्गत प्रलंबीत निधी देण्यात यावा तसेच शहरी व ग्रामीणच्या घरकुलांना समान निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी खासदार रामदास तडस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन करण्यात आली. यावेळी देवळी नगरपालिकेच्या गटनेत्या शोभा रामदास तडस यांचीही उपस्थिती होती.
खासदार रामदास तडस यांनी गुरुवारी सपत्नीक नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली. भारतात विविध क्षेत्रातून आपले अमुल्य योगदान देणाऱ्या ओबीसीमधील सर्व प्रवर्गाचे हित लक्षात घेऊन प्रस्तावित २०२१ च्या जनगणनेमध्ये ओबीसींची जातीनिहाय जनगणना करावी. वर्धा लोकसभा क्षेत्रातील वर्धा जिल्ह्यातील वर्धा, हिंगणघाट, आर्वी, पुलगाव, देवळी, सिंदी (रेल्वे) येथील नगरपरिषद व कारंजा (घाडगे), समुद्रपूर, आष्टी, सेलू येथील नगरपंचायत तसेच अमरावती जिल्ह्याच्या मोर्शी, वरुड, धामणगाव (रेल्वे), चांदुर (रेल्वे), शेंदुरजनाघाट या नगरपरिषद व नांदगाव (खंडेश्वर) येथील नगरपंचायतींना पंतप्रधान आवास योजना शहरी अंतर्गत ८ हजर ५४९ लाभार्थ्यांचे केंद्र सरकारच्या वाट्यातील १२९.०६ कोटींपैकी २६.०९ कोटीच प्राप्त झाले आहे. अद्यापही ११३.०२ कोटी केंद्र सरकारकडे प्रलंबीत असल्याने अनेक लाभार्थ्यांच्या घरकुलाचे काम पैशाअभावी रखडले आहे.
त्यामुळे तत्काळ निधी वितरीत करावा तसेच पंतप्रधान आवास योजना शहरी व ग्रामीणच्या घरकुलाला एक समान निधी देण्याकरिता निर्णय घेण्यात यावा, अशी मागणीही खासदार तडस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. पंतप्रधानांनीही सकारात्मक चर्चा करीत प्रश्न मार्गी लावण्याचा विश्वास व्यक्त केला.

Web Title: Make a Census of the OBCs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.