शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
2
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
3
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
4
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
5
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
6
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
7
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
8
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
9
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
10
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
11
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
12
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
13
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
14
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
15
‘स्लीपर वंदे भारत’ जगात स्वस्त! चीन, अमेरिकेत हायस्पीड ट्रेनचे तिकीट किती? आकडे अवाक् करतील
16
नव्या आर्थिक वर्षात टाटा मोठा धमाका करणार! लवकरच ६ नव्या 'ढासू' कार बाजारात आणणार; बघा संपूर्ण प्लॅन
17
हॉटेलची रूम दिसते चकाचक, पण टॉयलेट सीटपेक्षा घाणेरड्या असतात 'या' गोष्टी; वापरताना सावधान
18
महिलांना दरमहा ३००० रुपये, मोफत बस प्रवास अन्...! सुवेंदू सरकार ॲक्शन मोडवर, १ जूनपासून खात्यात जमा होणार पैसे
19
"रस्त्यावर नमाज पठण चालणार नाही, प्रेमाने सांगून ऐकलं नाही तर..."; मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा इशारा 
20
IPL 2026 सुरू असताना धोनी अचानक NSG कॅम्पमध्ये; कमांडोंसोबत केला नेमबाजीचा सराव (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

मुख्य साक्षदाराला बयान बदलविण्याची धमकी

By admin | Updated: April 3, 2016 03:51 IST

जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण राज्यात चर्चेत असलेल्या येथील रूपेश मुळे नरबळी प्रकरणात साक्षदारांचे बयान नोंदविण्यात आले आहे.

रूपेश मुळे नरबळी प्रकरण : शहर ठाण्यात गुन्हा दाखल
वर्धा : जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण राज्यात चर्चेत असलेल्या येथील रूपेश मुळे नरबळी प्रकरणात साक्षदारांचे बयान नोंदविण्यात आले आहे. या प्रकरणातील मुख्य साक्षदार कालिदास राऊत याला या प्रकरणात साक्ष बदलविण्यासंदर्भात धमकी मिळाल्याने चांगलीच खळबळ माजली आहे. या प्रकरणी शहर ठाण्यात शनिवारी अज्ञात आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रूपेश मुळे नरबळी प्रकरणात साक्षदारांचे बयान नोंदविण्यात येत आहे. यात रूपेश याला शेवटचा पाहणारा साक्षदार म्हणून कालिदास राऊत याची शनिवारी साक्ष होती. साक्ष देण्याकरिता न्यायालयात येण्यापूर्वी त्याला शुक्रवारी सायंकाळी एका अज्ञात इसमाने भ्रमणध्वनीवर या प्रकरणातील साक्ष बदलविण्यासंदर्भात धमकी दिल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी कालिदास याने सकाळीच पोलीस ठाणे गाठत तशी तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी भादंविच्या कलम १९५ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे.
साक्ष देण्याकरिता सकाळी कालिदास राऊत न्यायालयात हजर झाले असता त्यांनी न्यायाधीश अरविंद चांदेकर यांना प्रकाराची माहिती दिली. यावर न्यायाधीशांनी पोलिसांना कालिदास यांना सुरक्षा देण्याचे आदेश दिले. यावेळी सरकार पक्षाच्या वतीने कालिदास याची सरतपासणी केली. तर प्रकरणातील मुख्य आरोपी आसिफ खान याचे वकिल शहा यांनी प्रकरणात पुढची तारीख मिळण्याकरिता अर्ज सादर केला. यावर न्यायाधिशांनी त्यांना सोमवारची तारीख दिली. या प्रकरणी सोमवारी सुनावणी होणार असल्याची माहिती शासकीय अभियोक्ता अ‍ॅड. श्याम दुबे यांनी दिली.(प्रतिनिधी)

कालिदास राऊत यांना संरक्षण देण्याचे आदेश
प्रकरणातील मुख्य साक्षदार कालिदास राऊत याला धमकी देण्यात आल्याने शहर पोलिसांनी त्यांना सुरक्षा देण्याबाबतचे आदेश न्यायाधीश चांदेकर यांनी ठाणेदारांना दिले आहेत. त्यांच्याकडून तशी सुरक्षा पुरविण्यात येत आहे.

धमकी देणारा ‘तो’ कोण ?
रूपेश मुळे हत्या प्रकरणात साक्षदाराला धमकी दिल्याने या प्रकरणात आणखी कोणी सहभागी असल्याची शक्यता बळावली आहे. कालिदासच्या बयानात त्याचा उल्लेख होण्याची शक्यता असल्याने त्याला तशी धमकी देण्यात आल्याचा संशय व्यक्त होत आहे. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. यात धमकी देणाऱ्याचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.