शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

शासनाने अनुदान न दिल्याने महाबीजचे सोयाबीन महागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 05:01 IST

कृषी विभागाच्या नियोजनानुसार जिल्ह्यामध्ये मागील हंगामात १ लाख ७ हजार २२७ हेक्टरवर सोयाबीनची लागवड करण्यात आली होती. मात्र, यावर्षी यामध्ये वाढ झाली असून १ लाख ३९ हजार हेक्टरवर सोयाबीनची लागवड होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना माफक दरात सोयाबीनचे बियाणे उपलब्ध होणे अपेक्षित आहे. पण, गतवर्षी सोयाबीनला पावसाचा फटका बसल्याने आधीच सोयाबीनच्या बियाण्यांचा तुटवडा आहे.

ठळक मुद्देबियाण्याचे दीडपट वाढविले दर : शेतकऱ्यांच्या अडचणीत भर

अमोल सोटे।लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) (वर्धा) : यावर्षी कापसाला मिळणारा अत्यल्प भाव आणि विक्रीकरिता होत असलेला त्रास पाहून शेतकऱ्यांनी सोयाबीनचे क्षेत्र वाढविले आहे. अशातच शेतकऱ्यांच्या विश्वासाचे प्रतीक असलेल्या महाबीजने अनुदान न मिळाल्याचे कारण पुढे करीत सोयाबीन बियाण्याच्या दरात दीडपट वाढ केली आहे. याचाच फायदा घेत खासगी कंपनीनेही दर वाढविल्याने शेतकऱ्यांची चांगलीच अडचण झाली आहे.कृषी विभागाच्या नियोजनानुसार जिल्ह्यामध्ये मागील हंगामात १ लाख ७ हजार २२७ हेक्टरवर सोयाबीनची लागवड करण्यात आली होती. मात्र, यावर्षी यामध्ये वाढ झाली असून १ लाख ३९ हजार हेक्टरवर सोयाबीनची लागवड होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना माफक दरात सोयाबीनचे बियाणे उपलब्ध होणे अपेक्षित आहे. पण, गतवर्षी सोयाबीनला पावसाचा फटका बसल्याने आधीच सोयाबीनच्या बियाण्यांचा तुटवडा आहे. अशा परिस्थितीत प्रमाणिकरण व विश्वासार्हता असलेल्या महाबीजनेही सोयाबीन बियाण्यांच्या दरात भरमसाठ वाढ करून शेतकऱ्यांना अडचणीत टाकले आहे. मागीलवर्षी महाबीज सोयाबीनच्या ९३०५ या वाणाच्या बियाण्याची ३० किलोची बॅग १ हजार ४५० रुपयांची होती. यावर्षी त्यामध्ये ८९० रुपयांनी वाढ केली असून २ हजार ३४० रुपयांत घ्यावी लागत आहे. तर ९५६० या वाणाच्या बियाण्याची ४० किलोची बॅग मागीलवर्षी १ हजार ८५० रुपयांची होती. यावर्षी त्यामध्ये तब्बल १ हजार ४३० रुपयांची वाढ करण्यात आल्याने शेतकऱ्यांना ३ हजार २८० रुपयांत खरेदी करावी लागत आहे. महाबीजच्या बियाण्यांची किंमत वाढल्याचा फायदा घेत इतर खासगी कंपनीनेही बियाण्याचे दर वाढविल्याने यावर्षी सोयाबीन उत्पादकांची चांगलीच कोंडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.शेतकºयांचे कृषिमंत्र्यांना निवेदनवर्धा जिल्ह्याच्या सीमेवरील गावातील शेतकरी अमरावती, नागपूर, यवतमाळ येथून बियाण्यांची खरेदी करतात. मात्र, लॉकडाऊन असल्यामुळे आता तालुक्यातूनच बियाणे खरेदी करावे लागणार आहे. त्यामुळे कृषी केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी वाढणार आहे. बियाण्यांची दरवाढ म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळण्याचा प्रकार चालविला आहे. यावर्षी आष्टी तालुक्यात १२ हजार हेक्टरवर सोयाबीनचा पेरा होण्याचा अंदाज असून शेतकरी कितीही भाववाढ झाली तरी पर्याय नसल्याने बियाणे खरेदी करणार आहे. त्यामुळे शासनाने महाबीजला तत्काळ अुनदान दिले तर शेतकऱ्यांना मोठा आधार मिळेल. त्यामुळे तत्काळ अनुुदान द्यावे, अशी मागणी शेतकरी डॉ. नरेंद्र देशमुख, रवींद्र जाणे यांनी कृषिमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.शासनाकडून महाबीजला अद्यापपर्यंत अनुदान मिळाले नाही. म्हणून पूर्ण दराने सोयाबीनचे बियाणे विकणे सुरू आहे. यावर्षी ३० किलोच्या बॅगवर ६ रुपये तर ४० किलोच्या बॅगवर १० रुपये प्रतिकिलो वाढ केली आहे. शासनाने अनुदान दिले नसल्यामुळेच हा प्रश्न बिकट झाला आहे.- अजय फुलझेले, जिल्हा व्यवस्थापक, महाबीज, वर्धा.

टॅग्स :agricultureशेती