शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊन; गांधी आश्रम बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 05:00 IST

आश्रम पाहायला दिवसाला ८०० ते १००० पर्यटक येत असे; पण लॉकडाऊनमुळे आश्रमात कुणीही पर्यटक नसल्याने सर्वत्र निरव शांतता पसरलेली आहे. मात्र , आश्रमातील दैनिक स्वच्छतेची कार्य सुरक्षित अंतर ठेवून करण्यात येत आहे. आश्रमातील शांतता आणि स्वच्छता हे वैशिष्ट्य मानावे लागेल. जे बंदमध्येदेखील कायम सुरू आहे.

ठळक मुद्देइतिहासातील पहिलीच घटना : दैनंदिन प्रार्थना, स्वच्छता आदी कामे सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : ऐतिहासिक महात्मा गांधीजींचे आश्रम कोरोना विषाणूच्या प्रादुभार्वामुळे २१ दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहे. आश्रमाच्या इतिहासातील प्रथमच अशी घटना घडल्याची नोंद झालेली आहे.जगासमोर गांधीजींच्या वास्तव्य आणि कार्यामुुळे सेवाग्राम पुण्यभूमी ठरले आहे. आश्रम कार्यकर्त्यांनी सदैव गजबजले होते. स्वातंत्र्य चळवळ आणि रचनात्मक कार्याचे जन्मस्थान होते. गांधींसह अनेक महान व्यक्तींचे तब्बल १० वर्षे वास्तव्य आश्रमात राहिले होते.आश्रम पाहायला दिवसाला ८०० ते १००० पर्यटक येत असे; पण लॉकडाऊनमुळे आश्रमात कुणीही पर्यटक नसल्याने सर्वत्र निरव शांतता पसरलेली आहे. मात्र , आश्रमातील दैनिक स्वच्छतेची कार्य सुरक्षित अंतर ठेवून करण्यात येत आहे. आश्रमातील शांतता आणि स्वच्छता हे वैशिष्ट्य मानावे लागेल. जे बंदमध्येदेखील कायम सुरू आहे. सकाळ आणि सांयकाळची प्रार्थना सुरू आहे. गोशाळा आणि शेतातील जनावरांची देखभाल संबंधित विभागाचे कार्यकर्ते चांगल्या प्रकारे करीत आहेत.चरखा, ग्रामोद्योग, विक्री आदी विभाग बंद ठेवण्यात आलेले आहेत. जगासाठी प्रेरणास्थान असलेले बापूंच्या आश्रमला लॉकडाऊनमुळे बंद ठेवावे लागले, ही घटना इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाची ठरलेली आहे. नव्या व जुन्या पिढीसाठी ही महत्वाचीच घटना म्हणावी लागेल.जगावर कोरोना विषाणूचे संकट असल्याने लॉकडाऊनची घोषणा करण्यात आल्याने आश्रम पर्यटकांसाठी बंद करण्यात आलेले आहे. आश्रमातील महत्त्वाची दैनिक कामे मात्र सुरू आहेत. इतिहासात आश्रम प्रथमच बंद करण्यात आलेला आहे. पुढील सूचना येईपर्यंत प्रवेशद्वार बंद राहील तसेच क्वारंटायीनसाठी प्रतिष्ठानने यात्री निवास मधील १६ खोल्या उपलब्ध करून दिल्या असून आवश्यक ते सहकार्य राहील.-टी.आर.एन.प्रभू, अध्यक्ष, आश्रम प्रतिष्ठान, सेवाग्राम 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या