The lively play of the peasants turns the night | रात्रीचे ओलित करते शेतकऱ्यांच्या जिवाशी खेळ
रात्रीचे ओलित करते शेतकऱ्यांच्या जिवाशी खेळ

लोकमत न्यूज नेटवर्क
नाचणगाव : खरिपाचे पीक अतिपावसाने गेले. सोयाबीनला परतीच्या पावसाने ओले केले. त्यामुळे कपाशीलाही फटका बसला. अशा परिस्थितीत शेतकºयाच्या आशा पल्लवित झाल्या, त्या रबी पिकामुळे. आर्थिक अडचण दूर करण्यास मदत होईल या भावनेने रबी पिकाला पाण्याची आवश्यकता आहे. महावितरणच्या वेळापत्रकानुसार आठवड्यातील चार दिवस दिवसभर वीज तर तीन दिवस रात्री ते सकाळी ८.३० पर्यंत वीज शेतकऱ्यांना मिळणार आहे. चणा, गहू या पिकांना ओलित करावयाचे असल्यास चार दिवस सकाळचे ओलित करणे शक्य आहे. परंतु, तीन दिवस रात्री वीज असल्याने शेतकºयांची अडचण शेतकºयांना झाली आहे.
रात्री ओलीत करताना वन्यप्राण्यांचा त्रास मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे ओलीत करायचे असल्यास जिवावर उदार होऊन ओलीत करावे लागते. तीन दिवस रात्री वीज राहणार असल्याने बिघाड आल्यास दुरुस्त होत नाही. विजेची वाट पाहण्यात शेतकºयांना रात्र काढावी लागते. खंडित झालेला वीजपुरवठा कधीही सुरळीत होऊ शकतो या आशेने शेतकरी निद्राहीन असतो. तांत्रिक अडचण असल्यास वीजपुरवठा बंद असतो. त्यामुळे शेतकºयांचा वेळ वाया जातो. सकाळची वेळ दिल्यास ओलित शक्य होईल, असे शेतकरी बोलत असून वीज वितरणने उपाययोजना करण्याची मागणी आहे.

दिवसा हवी वीज
खरिपात शेतकऱ्यांना नुकसानीला तोंड द्यावे लागले. हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेला. आता शेतकऱ्यांची भिस्त रबी हंगामावर आहे. रबी हंगाम सुरू झाला आहे. हा हंगामही हातून जाऊ नये याकरिता वीज वितरणने ओलिताकरिता दिवसा वीजपुरवठा करून मदत मागणी शेतकºयांतून होत आहे.

Web Title: The lively play of the peasants turns the night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.