शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
4
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
5
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
6
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
7
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
8
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
9
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
10
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
11
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
12
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
13
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
14
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
15
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
16
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
17
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
18
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
19
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
20
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

खताचे जादा दर घेतल्यास परवाना निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 05:00 IST

जिल्ह्यात एकूण सुमारे १ हजार २१५ कृषी केंद्र आहेत. या व्यावसायिक प्रतिष्ठानांमध्ये सध्या शेतकरी बियाणे व खताची खरेदी करण्यासाठी गर्दी करीत आहे. शिवाय १ हजार ८७६ हेक्टरवर काही शेतकऱ्यांनी धूळपेरणी केली आहे. अंकुरलेल्या पिकाची झपाट्याने वाढ व्हाची या हेतूने शेतकरी पिकांना रासायनीक खत देतात.

ठळक मुद्देकृषी केंद्र व्यावसायिकांना कृषी विभागाची तंबी : युरियाचा दर २६६ रुपये निश्चित

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : विविध कंपन्यांची त्यांच्या खताचे दर निश्चित केले आहे. शिवाय सर्व कंपन्यांचा युरियाचे दर २६६ रुपये निश्चित करण्यात आले आहे. निश्चित केलेल्या दरापेक्षा जास्त दर कुठल्या कृषी केंद्र व्यावसायिकांनी शेतकऱ्यांकडून घेतल्यास त्या कृषी केंद्र व्यावसायिकाचा परवाना निलंबीत करण्याची कारवाई कृषी विभागाकडून करण्यात येणार आहे.जिल्ह्यात एकूण सुमारे १ हजार २१५ कृषी केंद्र आहेत. या व्यावसायिक प्रतिष्ठानांमध्ये सध्या शेतकरी बियाणे व खताची खरेदी करण्यासाठी गर्दी करीत आहे. शिवाय १ हजार ८७६ हेक्टरवर काही शेतकऱ्यांनी धूळपेरणी केली आहे. अंकुरलेल्या पिकाची झपाट्याने वाढ व्हाची या हेतूने शेतकरी पिकांना रासायनीक खत देतात. परंतु, याच संधीचा फायदा घेत काही कृषी केंद्र व्यावसायिक खतकोंडी झाल्याचे कारण पुढे करून विविध खतांचे कंपन्यांनी निश्चित केलेल्या दरापेक्षा जास्त दर शेतकऱ्यांकडून उकळतात. याच मनमर्जी कामांना बे्रक लागावा म्हणून आता कृषी विभागाने कंबर कसली आहे. खतांचे निश्चित केलेल्या दरापैकी कुणी कृषी केंद्र व्यावसायिक जादा दर घेताना आढळल्यास त्या कृषी केंद्र व्यावसायिकावर खत नियंत्रण आदेश १९८५ अंतर्गत परवाना निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे.खत खरेदी करताना करा बिलाची मागणीशेतकऱ्यांनी कृषी केंद्रांमधून खत खरेदी करताना कृषी केंद्र व्यावसायिकाला खरेदी केल्या खताची शेतकऱ्यांनी मागणी करावी. जो कृषी केंद्र व्यावसायिक पक्के बिल देणार नाही त्याच्यावरही कारवाई करण्यात येणार आहे.असे आहेत खतांचे निश्चित केलेले दरकोरोमंडलचे डीएपी (१,२५० रुपये), झेडएन १०.२६.२६ (१,२३५ रुपये), १०.२६.२६ (१,१८५ रुपये), २०.२०.०.१३ (१,००० रुपये), १४.३५.१४ (१,२७५ रुपये), १५.१५.१५.०९ (१,०४० रुपये), १२.३२.१६ (१,२०० रुपये), ग्रो स्मार्ट (१,२१० रुपये), एसएसपी (४०५ रुपये), इफकोचे १०.२६.२६ (१,१७५ रुपये), १२.३२.१६ (१,१८५ रुपये), डीएपी (१,२०० रुपये), महाधन २४.२४.० (१,२२० रुपये), १०.२६.२६. (१,२९५ रुपये), १२.३२.१६ (१,३०५ रुपये), २०.२०.०.१३ (१,०६५ रुपये), डीएपी (१,२५० रुपये), एसएसपी दाणेदार (३९० रुपये), आरसीएफचे सुफला १५.१५.१५. (१,०६० रुपये), युरिया (२६६ रुपये), आयपीएलचे पोटॅश (९५० रुपये), १६.१६.१६. (१,०७५ रुपये), कृषी उद्योगचे १८.१८.१० (१,०२५ रुपये), बसंत अ‍ॅग्रोटेकचे १८.१८.१० (१,०२५ रुपये), कृभकोचे डीएपी (१,२५० रुपये) दर निश्चित करण्यात आला आहे.लेखी अर्ज धरणार ग्राह्यएखाद्या शेतकऱ्याकडून कृषी केंद्र व्यावसायिकाने खताचे जादा दर घेतल्यास त्या शेतकऱ्याने तातडीने कृषी विभागाकडे लेखी अर्ज सादर करावा. सदर अर्जासोबत खरेदी केलेल्या खताचे बिल जोडणे क्रमप्राप्त आहे. तक्रार प्राप्त होताच कृषी विभागाकडून झटपट कारवाई करण्यात येणार आहे.शेतकऱ्यांनी खत खरेदी करताना पक्के बिल घ्यावे. शिवाय कुठल्या कृषी व्यावसायिकांनी कंपन्यांनी निश्चित केलेल्या दरापेक्षा जास्त दर घेतल्यास त्याची लेखी तक्रार कृषी विभागाला करावी. तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल.- संजय बमनोटे, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, वर्धा.

टॅग्स :Marketबाजार