शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
2
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
3
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
4
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
5
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
6
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
7
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
8
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
9
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
10
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
11
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
12
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
13
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
14
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
15
‘स्लीपर वंदे भारत’ जगात स्वस्त! चीन, अमेरिकेत हायस्पीड ट्रेनचे तिकीट किती? आकडे अवाक् करतील
16
नव्या आर्थिक वर्षात टाटा मोठा धमाका करणार! लवकरच ६ नव्या 'ढासू' कार बाजारात आणणार; बघा संपूर्ण प्लॅन
17
हॉटेलची रूम दिसते चकाचक, पण टॉयलेट सीटपेक्षा घाणेरड्या असतात 'या' गोष्टी; वापरताना सावधान
18
महिलांना दरमहा ३००० रुपये, मोफत बस प्रवास अन्...! सुवेंदू सरकार ॲक्शन मोडवर, १ जूनपासून खात्यात जमा होणार पैसे
19
"रस्त्यावर नमाज पठण चालणार नाही, प्रेमाने सांगून ऐकलं नाही तर..."; मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा इशारा 
20
IPL 2026 सुरू असताना धोनी अचानक NSG कॅम्पमध्ये; कमांडोंसोबत केला नेमबाजीचा सराव (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

अत्यल्प अनुदानामुळे शेततळ्यांकडे पाठ

By admin | Updated: April 3, 2016 03:51 IST

दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी तसेच जलसिंचनासह भूजल पातळीमध्ये वाढ व्हावी या अनुषंगाने शासनाने ...

पंचायत समितीला ५०० तळ्यांचे उद्दिष्ट : प्रत्येक ग्रामपंचायतीला प्रस्ताव पाठविणे सक्तीचे
वर्धा : दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी तसेच जलसिंचनासह भूजल पातळीमध्ये वाढ व्हावी या अनुषंगाने शासनाने ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना सुरू केली; पण यात आकार तेवढाच आणि अनुदान कमी असल्याने शेतकऱ्यांत निरूत्साह दिसून येत आहे. वर्धा पं.स. कार्यालयात आजपर्यंत केवळ ३८ प्रस्ताव दाखल झाले आहेत.
वर्धा तालुक्यात गत दोन-तीन वर्षांपासून दुष्काळी स्थिती आहे. पावसाळ्यात पावसाचे पाणी अडवून जलसाठ्यात वाढ व्हावी यासाठी शासनाच्यावतीने जलयुक्त शिवार अभियानांतर्गत अनेक कामे करण्यात आली आहेत. पावसाचे अडविलेले पाणी शेतकऱ्यांना पिकांसाठी उपलब्ध व्हावे म्हणून शासनाच्यावतीने पंचायत समिती अंतर्गत ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना सुरू करण्यात आली. पाणीटंचाईची भीषणता पाहता या योजनेला प्रतिसाद मिळेल असे वाटत होते; पण अत्यल्प अनुदान दिले जाणार असल्याने शेतकऱ्यांनी या योजनेकडे पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे. शेततळ्यासाठी खर्च सुमारे ८० हजार रुपये आणि अनुदान केवळ ५० हजार रुपये असल्याने शेतकरी प्रस्ताव सादर करण्यास धजावत नसल्याचे दिसून येत आहे.
गत तीन वर्षांपासून लहरी निसर्गामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे. यामुळे शेती व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. शेतीत हाताला काम नसल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी शेतमजूर रोजगाराच्या शोधात इतरत्र भटकत आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षीचा दुष्काळ भयावह आहे. तालुक्यातील विहिरींनी तळ गाठला असून अनेक गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागणार आहे. काही ठिकाणी बैलबंडीद्वारे शेतातून पाणी आणले जात असल्याचे दिसते. भीषण पाणीटंचाई जाणवत असल्याने शेतकऱ्यांनी शेत परिसरात नवीन बोअर, विहिरी, आडवे बोअर तसेच नवीन विहिरींचे खोदकाम करण्यास सुरूवात केल्याचे दिसून येते.
आगामी काळात शेतीसाठी पाणी उपलब्ध व्हावे म्हणून सुरू केलेल्या शेततळे योजनेसाठी पंचायत समिती विभागांतर्गत ५०० तळ्यांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. तालुक्यातील ७४ ग्रामपंचायतीमधून प्रत्येकी सात प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. या शेततळ्याचा आकार ३० बाय ३ मिटर राहणार आहे. शेततळ्याचे काम पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्याच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा करण्यात येणार आहे. शेततळ्याचा आकार सारखाच; पण त्यासाठी अनुदान कमी केले आहे. यामुळे ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेला प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसते.(तालुका प्रतिनिधी)