सखींनी घेतले पाककलेचे धडे

By Admin | Updated: October 14, 2015 02:13 IST2015-10-14T02:13:54+5:302015-10-14T02:13:54+5:30

लोकमत सखी मंच हा महिलांकरिता नेहमीच वैविध्यपूर्ण कार्यक्रम राबवित असतो. याच उपक्रमाचा भाग म्हणून

Lessons from the cookie recipes | सखींनी घेतले पाककलेचे धडे

सखींनी घेतले पाककलेचे धडे

सखी मंचचा उपक्रम : पदार्थ झटपट तयार करण्याचे प्रशिक्षण
पुलगाव : लोकमत सखी मंच हा महिलांकरिता नेहमीच वैविध्यपूर्ण कार्यक्रम राबवित असतो. याच उपक्रमाचा भाग म्हणून पुलगाव येथील सखींकरिता झटपट पदार्थ तयार करण्याची कार्यशाळा घेण्यात आली. या माध्यमातून सहभागी सखींना झटपट पाककृतीचे तंत्र अवगत करीत कमी वेळात विविध रूचकर पदार्थ तयार केले.
या प्रशिक्षण कार्यशाळेत भावना लुकंड यांनी सखींना पाककलेचे धडे दिले. कार्यशाळेत सखींनी प्रात्यक्षिक सादर करताना ब्रेड मिठाई, गुलाब जामुन, नारीयल रोल, बिस्कीट केक, दाबेली, ब्रेड रोव्हर, व्हेजिटेबल दहीवडा, पापडा असे पदार्थ तयार केले. पदार्थांची पौष्टिकता महिलांना विशद करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन कविता बदणोरे यांनी केले. यावेळी श्वेता संचिती, सुनील सुराणा, हर्षा नहारा, श्रीश्रीमाल तसेच सखींनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Lessons from the cookie recipes