शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
3
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
4
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
5
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
6
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
7
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
8
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
9
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
10
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
11
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
12
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
13
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
14
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
15
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
16
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
17
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
18
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
19
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
20
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

उधारीमुळे शेतकऱ्यांवर बाजारपेठेत तोंड लपविण्याची वेळ

By admin | Updated: January 31, 2015 01:55 IST

कपाशी, सोयाबीन व तूर या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या पिकांना यंदा निसर्गाचा व अल्प हमीदरांचा फटका बसला.

सेलू : कपाशी, सोयाबीन व तूर या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या पिकांना यंदा निसर्गाचा व अल्प हमीदरांचा फटका बसला. यामुळे शेतकऱ्यांचे बजेट कोलमडले़ बाजारातील शेतकऱ्यांची पत धोक्यात आली. कृषी केंद्र, किराणा, कापड व इतर वस्तू वर्षभर उधारीवर घेण्याची सवय असलेला शेतकरी आता त्याचे खाते चुकता करू शकत नाही. यामुळे बाजारात येऊन नाईलाजाने तोंड लपविण्याची दुर्दैवी वेळ शेतकऱ्यांवर आली आहे़ सततच्या नापिकीमुळे शेतकरी अडचणीत आला आहे. घरात खाणारे तोंड वाढत आहे. घर खर्चही वाढतच आहे. महागाई शिखरावर पोहोचत आहे; पण शेतकऱ्यांना सतत नापिकी व भावबाजीचा फटका सहन करावा लागत आहे. कापूस, सोयाबीन, तूर या पिकांचा उतारा नाममात्र असून यंदा भावही पडले आहेत़ बाजारातील उधारी वाढली आहे. दुकानदार उधारी वसुलीचा तगादा लावत आहेत़ बाजारपेठेत आल्यानंतर शेतकरी खिसा रिकामा असल्याने उधारी फेडू शकत नाही. यामुळे शेतकऱ्यावर दुकानदाराजवळून जाताना तोंड लपवून जाण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. अनेक गावांतील सधन शेतकरीही मेटाकुटीस आले आहेत़ इच्छा असतानाही उधारी फेडता येत नसल्याचे दु:ख शेतकऱ्यांना सलत आहे़ बाजारात त्याची असलेली पत जात असल्याचे काही शेतकऱ्यांनी बोलून दाखविले. यामुळे शेतकरी वैफलग्रस्त होण्याचे प्रयाण वाढत असल्याचे दिसते़(तालुका प्रतिनिधी)