शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

धामणगावात सोयाबीन खरेदीचा शुभारंभ

By admin | Updated: October 20, 2014 23:17 IST

धामणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज बाजारच्या आवारात सभापती श्रीकांत गावंडे यांच्या हस्ते सोयाबीन खरेदीचा शुभारंभ रविवारी करण्यात आला.

धामणगाव रेल्वे : धामणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज बाजारच्या आवारात सभापती श्रीकांत गावंडे यांच्या हस्ते सोयाबीन खरेदीचा शुभारंभ रविवारी करण्यात आला. बाभुळगाव तालुक्यातील फाळेगाव येथील भाष्करराव मकेश्वर या शेतकऱ्याच्या सोयाबीनला पहिल्याच दिवशी ३ हजार १११ रूपये भाव देण्यात आले़ संपूर्ण विदर्भात ख्यातीप्राप्त असलेल्या धामणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत वर्धा, यवतमाळ व अमरावती आदी जिल्ह्यातील शेतकरी आपला शेतमाल विक्रीकरिता नेहमीच आणतात. शेतकऱ्यांना पाच रूपयांत भोजन नगदी चुकारा व सुसज्ज बाजार आवार असल्याने शेतकरी या बाजार समितीत माल विक्र ीस आणतात़ यंदा धनश्री ट्रेडिंग कंपनी या खरेदीदाराने सोयाबीन खरेदी केले तर सोयाबीनचा लिलाव अडते लक्ष्मीनारायण पनपालिया यांनी केला़ सभापती श्रीकांत गावंडे यांच्याहस्ते विधिवत वजन काट्याचे पूजन करण्यात आले. यंदा सोयाबीनच्या पिकांची अवस्था फारच खराब आहे. सोयाबीनची भरण झालेली नाही़ यावर्षी एकरी दोन ते तीन क्विंटल उत्पादन मिळण्याची शक्यता आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चसुध्दा मिळणे अशक्य आहे़ अशा परिस्थितीत केंद्र सरकार व राज्य सरकारने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना एकरी पाच हजार रूपयांची सरसकट मदत करावी, जेणेकरून उत्पादन खर्च तरी निघेल़, अशी मागणी श्रीकांत गावंडे यांनी शेतकऱ्यांच्यावतीने व्यक्त केली़