शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
4
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
5
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
6
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
7
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
8
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
9
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
10
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
11
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
12
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
13
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
14
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
15
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
16
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
17
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
18
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
19
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
20
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
Daily Top 2Weekly Top 5

गेल्यावर्षी ठणठणाट, यावर्षी जलाशय अर्धेअधिक फुल्ल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 05:00 IST

जिल्ह्यातील आठही तालुक्यात ११ मोठे तर २० लघू व मध्यम जलाशय आहेत. गेल्यावर्षी २१ जूलैपर्यंत आठही तालुक्यामध्ये १६१८.९७ मिलीमीटर पावसाची नोेंद करण्यात आली होती. यावर्षी याच कालावधीमध्ये २९३६.६५ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे डोंगरगाव प्रकल्प हाऊसफुल्ल झाला असून वर्धा कारनदी प्रकल्पही ९७.६१ टक्के भरला आहे. सोबतच दहेगाव (गोंडी) हा लघू प्रकल्प ९९.०० टक्के भरला आहे.

ठळक मुद्देमोठ्या ११ तर २० लघु प्रकल्पांचा समावेश : गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा पावसाचा जोर, सर्वदूर पावसाने शेतकरी सुखावला

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : प्रारंभी पावसाने दडी मारल्यामुळे जलाशयांची पातळी खालावली होती. मात्र गेल्या महिन्यात आणि या जुलै महिन्यांमध्ये दमदार पावसाने सर्वदूर हजेरी लावल्याने जिल्ह्यातील मोठ्या, मध्यम व लघू अशा सर्वच जलाशयांची पातळी ५० टक्केच्या वर गेली आहे. गेल्यावर्षी या महिन्यापर्यंत ठणठण असलेल्या जलाशयात यावर्षी मात्र पाण्याची मुबलकता दिसून येत आहे.जिल्ह्यातील आठही तालुक्यात ११ मोठे तर २० लघू व मध्यम जलाशय आहेत. गेल्यावर्षी २१ जूलैपर्यंत आठही तालुक्यामध्ये १६१८.९७ मिलीमीटर पावसाची नोेंद करण्यात आली होती. यावर्षी याच कालावधीमध्ये २९३६.६५ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे डोंगरगाव प्रकल्प हाऊसफुल्ल झाला असून वर्धा कारनदी प्रकल्पही ९७.६१ टक्के भरला आहे. सोबतच दहेगाव (गोंडी) हा लघू प्रकल्प ९९.०० टक्के भरला आहे. यासह आंजी बोरखेडी, रोठा-२, आष्टी, पिलापूर, कन्नमवारग्राम, परसोडी हे लघू प्रकल्पातही सध्या ७० टक्क्यापेक्षा अधिक जलसाठा आहेत. जिल्ह्यात उशिराका होईना पण, दमदार पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला आहे. विशेषत: सर्वच तालुक्यामध्ये समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला आहे. अजून दमदार पावसाचे दिवस शिल्लक असल्याने यावर्षी सर्वच जलाशये हाऊसफुल्ल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.दोन जलाशयांची दारे उघडलीवर्धा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या नांद प्रकल्प, वडगाव प्रकल्प, उर्ध्ववर्धा प्रकल्प आणि बेंबळा प्रकल्पाचा वर्ध्यासह नागपूर, अमरावती, यवतमाळ याही जिल्ह्याला मोठा फायदा होतो. यापैकी नांद प्रकल्प वगळता इतर सर्वच जलाशयांची पातळी ६० टक्क्यापेक्षा अधिक असल्याने वडगाव प्रकल्पाचे तीन तर बेंबळा प्रकल्पाचे २ गेट गेट १० से.मी.ने उघडण्यात आले आहे. त्यामुळे लगतचे नदी, नालेही ओसंडून वाहत आहे.

टॅग्स :RainपाऊसDamधरण