शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
3
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
4
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
5
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
6
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
7
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
8
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
9
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
10
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
11
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
12
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
13
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
14
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
15
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
16
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
17
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
18
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
19
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
20
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
Daily Top 2Weekly Top 5

विजेच्या लपंडावाने शेतकरी त्रस्त

By admin | Updated: October 28, 2014 23:01 IST

गत काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे पिकांना ओलीत करणे गरजेचे झाले आहे. पीक वाचविण्यासाठी धडपडत असलेल्या परिसरातील शेतकऱ्यांना मात्र विजेच्या लपंडावाचा सामना करावा लागत आहे.

वडनेर : गत काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे पिकांना ओलीत करणे गरजेचे झाले आहे. पीक वाचविण्यासाठी धडपडत असलेल्या परिसरातील शेतकऱ्यांना मात्र विजेच्या लपंडावाचा सामना करावा लागत आहे. या त्रासामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. वीज वितरणचे कर्मचारी शेतकऱ्यांच्या तक्रारीकडे डोळेझाक करीत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे. या क्षेत्रात लाईनमनकडे काम अधिक व कर्मचारी कमी अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे कृषी पंपाच्या तक्रारीचे निरसन रितसर होत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. एकाच दिवसातून अनेकदा वारंवार वीज खंडीत होत असल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. भारनियमनाच्या वेळा बरोबर नसल्याने कधी रात्री तर कधी दिवसा वीज पुरवठा खंडीत होतो. शेतकरी मात्र आपला जीव टांगणीला लावून रात्री अपरात्री ओलीतासाठी शेतावर जात असतात. अशात एखादी अप्रिय घटना घडली तर त्याची जबाबदारी कुणाची असा प्रश्न शेतकऱ्यांनी केला आहे. भारनियमन वाढत असल्याने खरीपात ओलीत करणे अवघड झाले आहे. आता रबी हंगाम सुरू होत आहे. यात भारनियमनाचा बडगा कायम असल्यास रबीला ओलीत कसे करावे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. रबी पिकांची ओलिताची सोय असून सुध्दा या विजेच्या लंपडावाने शेतकरी त्रस्त असल्याचे बोलत आहे. त्यामुळे यावर्षी रबी पिकांना ही फटका बसण्याचे संकेत आहेत. (वार्ताहर)