कोसुर्ला शाळेत भरला वाचन कट्टा

By Admin | Updated: October 16, 2015 02:56 IST2015-10-16T02:56:16+5:302015-10-16T02:56:16+5:30

मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करत असतानाच त्यांच्या व्यक्तीमत्त्वाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्म दिवस....

Kosurala's school is full of reading | कोसुर्ला शाळेत भरला वाचन कट्टा

कोसुर्ला शाळेत भरला वाचन कट्टा

सतत वाचनाचा संकल्प : उच्च प्राथमिक शाळेतील उपक्रम
वर्धा : मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करत असतानाच त्यांच्या व्यक्तीमत्त्वाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्म दिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात आला. हिंगणघाट तालुक्यातील कोसर्ल्याच्या उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी महापुरुषांची चरित्र वाचन कट्ट्याच्या माध्यमातून सार्वजनिक वाचन केले. शाळेच्या ८० विद्यार्थ्यांनी सुरू केलेला वाचन कट्टा या पुढेही नियमित सुरू ठेवण्याचा संकल्प केला आहे.
जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्म दिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून जिल्हा परिषदेच्या कोसुर्ला येथील उच्च प्राथमिक शाळेत साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना माहपुरुषांचे चरित्र तसेच विविध विषयावरील बालवाङमय भेट देण्यात आले. विद्यार्थ्यांनी वाचन कट्ट्याच्या माध्यमातून सामूहिकपणे पुस्तकांचे वाचन केले.

Web Title: Kosurala's school is full of reading