शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

ज्ञानातूनच सुसभ्य समाजाची निर्मिती होते

By admin | Updated: July 2, 2014 23:25 IST

ज्ञान वितरित केल्याने ज्ञान वाढते व ज्ञानातूनच सुसभ्य समाजाची निर्मिती होते. म्हणून स्वत:चा, समाजाचा आणि देशाचा विकास करण्यासाठी शिक्षित व सुसंस्कारित समाजाची आवश्यकता आहे,

वर्धा : ज्ञान वितरित केल्याने ज्ञान वाढते व ज्ञानातूनच सुसभ्य समाजाची निर्मिती होते. म्हणून स्वत:चा, समाजाचा आणि देशाचा विकास करण्यासाठी शिक्षित व सुसंस्कारित समाजाची आवश्यकता आहे, असे विचार बौद्ध धम्मगुरू भदन्त आर्य नागार्जून सुरई ससाई यांनी व्यक्त केले.डॉ. आंबेडकर कॉलेज आॅफ सोशल वर्क येथे सर्वसोयीयुक्त सुभेदार रामजी आंबेडकर कम्यूनिटी लायब्ररीचे उद्घाटन भदन्त सुरई ससाई यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते़ कार्यक्रमाला भूजल सर्वेक्षण विभागाचे वैज्ञानिक त्रिलोक हजारे, प्रा. बोधी, डॉ. चेतना सवाई, भन्ते धम्मसागर, राही गायकवाड, प्राचार्य डॉ. मिलिंद सवाई उपस्थित होते. बहुजन समाजातील विद्यार्थी व नागरिकांनी या लायब्ररीचा लाभ घेऊन आपले ज्ञान वाढविण्याचे आवाहन डॉ. चेतना सवाई यांनी केले़ भदन्त धम्मसागर यांनी डॉ. आंबेडकरांना अभिप्रेत शिक्षित समाजाची रचना निर्माण करण्यासाठी अशा लायब्ररीची गरज असल्याचे सांगितले. वरिष्ठ भूवैज्ञानिक त्रिलोक हजारे यांनी युवकांना स्पर्धेच्या जगात आपले स्थान निर्माण करण्यासाठी भरपूर वाचन करावे, असा सल्ला दिला. डॉ. आंबेडकर कॉलेज आॅफ सोशलवर्कमध्ये अत्याधुनिक व्यवस्थेसह क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व इथोथीथास अय्यंकाली संशोधन केंद्राचेही उद्घाटन भन्ते सुरई ससाई यांनी केले. याप्रसंगी टाटा इन्स्टीट्यूट आॅफ सोशल सायन्सेस मुंबईचे प्रा. बोधी, निलेश थूल, अतुल आनंद, मुकेश शेंडे, सुकन्या शेट्टी, राही गायकवाड, मिशिगन युनिवर्सीटी अमेरिका येथील ताहा अब्दुल रोफ, केरळचे जी.आय. सॅम्युअल, चेन्नईचे चंद्रशेखर, जोशुआ इसाक, हिंदी विद्यापीठाचे अभय तायडे, अवधेश कुमार व लायब्ररीचे संचालक जवाहरलाल नेहरू विद्यापीठ दिल्लीचे अनुपकुमार यांनी स्पर्धा परीक्षा व संशोधनाबाबत मार्गदर्शन केले.या केंद्रातून बहुजन समाजाच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याचे निशुल्क मार्गदर्शन केले जात आहे. सोबतच संघ लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग व विदेशात शिकण्याची तयारी आणि इतर स्पर्धा परीक्षांबाबत मार्गदर्शन करण्यासाठी टाटा समाजविज्ञान संस्था मुंबई, दिल्ली विद्यापीठ, हैद्राबाद विद्यापीठ व चेन्नईचे विद्वान शिक्षक मार्गदर्शन करतील. या लायब्ररीमध्ये भारतात प्रकाशित होणारे सर्व जर्नल्स, वर्तमानपत्रे व भरपूर साहित्य आणि पुस्तके उपलब्ध करून देण्यात आले आहे.या लायब्ररीमध्ये सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत सर्व नागरिकांना नि:शुल्क प्रवेश असून याचा लाभ घेण्याचे आवाहन संयोजक अनुपकुमार दिल्ली व डॉ. चेतना सवाई यांनी केले. यावेही प्राध्यापक, कर्मचारी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)