शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! बच्चू कडू यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण घेतले हाती; "झेंडा बदलला पण अजेंडा नाही.."
2
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
3
सराफा बाजारात सोन्याचा दर किती? दागिने बनवायचे तर..., सोन्या-चांदीच्या किमतींत पुन्हा उसळी...
4
$१ ची किंमत ₹९५.२०: डॉलरच्या समोर रुपया धाराशाही; पहिल्यांदाच विक्रमी नीचांकी स्तरावर भारतीय चलन
5
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
6
‘शिवाजी कोण होता?’ उर्दू आवृत्तीच्या २५ हजारांवर प्रतींची विक्री, पुस्तक पोहोचले पाकिस्तानात
7
९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री! जिच्या नावाने भारताने पाकिस्तानवर डागलेली मिसाईल
8
स्मार्टफोन जगतात मोठी खळबळ: OnePlus आणि Realme चं मर्जर होणार? पाहा डिटेल्स
9
कोल्हापुरी ब्रँड 'प्राडा'ने स्वीकारला, नवीन चप्पल बाजारात; ३० जणांना इटलीत प्रशिक्षणाची संधी
10
अजब लग्नाची गजब कहाणी, ६६ वर्षांच्या आजोबांनी नातीच्या वयाच्या तरुणीसोबत लग्न 
11
भीषण अपघात! "जागाच नव्हती, मजुरांना अक्षरशः कोंबून भरलं"; १६ मजुरांचा मृत्यू; २५ जण जखमी
12
Maharashtra Din 2026 Wishes: महाराष्ट्र आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा मराठमोळा सण
13
Crude Oil Price: कच्च्या तेलाच्या किमतींचा भडका! क्रूड प्रति बॅरल $१२० च्या पार, जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठं संकट
14
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
15
१ मे वैशाख पौर्णिमा: रात्री ९ ते १२ दरम्यान करा 'हा' सोपा उपाय; चंद्र देव पूर्ण करतील सर्व इच्छा!
16
VIDEO: मुंबई इंडियन्सच्या मॅचसाठी विनोद कांबळी वानखेडे स्टेडियमवर, अवस्था पाहून चाहते हळहळले
17
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी; पटापट चेक करा २४K, २२K आणि १८K सोन्याचा भाव
18
"मुलगाच राहिला नाही, तर महाल काय कामाचा?"; अभिनेत्याच्या आईने सोडला ८० कोटींचा बंगला, राहते झोपडीत
19
VIDEO: धडकी भरवणारा अपघात! टायर फुटला, नियंत्रण सुटले अन् १५० फूट खोल दरीत गेली कार
20
लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् खुर्च्यांची फेकाफेक; लग्नात मटणावरून पाहुण्यांमध्ये मोठा राडा
Daily Top 2Weekly Top 5

कामगारांना न्याय द्या अन्यथा रेल्वे रोखणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 05:00 IST

वारंवार जिल्हा प्रशासनाला निवेदन देऊनही उपाययोजना होत नसल्याने स्वाभिमानी बांधकाम कामगार संघटनेच्या नेतृत्वात मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन देऊन पंधरा दिवसात समस्या सोडवा अन्यथा रेल्वेरोको आंदोलन करणार, असा इशारा स्वाभिमानी बांधकाम कामगार संघटनेच्यावतीने देण्यात आला आहे.

ठळक मुद्देधडक मोर्चा : प्रशासनाला कामगार संघटनेचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या समस्या दिवसेंदिवस वाढतच आहे. यासंदर्भात वारंवार जिल्हा प्रशासनाला निवेदन देऊनही उपाययोजना होत नसल्याने स्वाभिमानी बांधकाम कामगार संघटनेच्या नेतृत्वात मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन देऊन पंधरा दिवसात समस्या सोडवा अन्यथा रेल्वेरोको आंदोलन करणार, असा इशारा स्वाभिमानी बांधकाम कामगार संघटनेच्यावतीने देण्यात आला आहे.ग्रामसेवकाने चौकशी करुन बांधकाम कामगारांना विनाविलंब प्रमाणपत्र द्यावे. शासनासह जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशाची पायमल्ली करणाºया ग्रामसेवकावर कठोर कारवाई करावी. सरकारी कामगार अधिकारी कार्यालयात कामगारांची नोंदणी, नुतनीकरण व लाभार्थी प्रकरणे त्वरीत निकाली काढावे. वर्धा येथे सरकारी कामगार कार्यालयात पूर्णवेळ अधिकारी द्यावा. दोन मुलींच्या विवाहाकरिता नोंदणीकृत कामगारांना प्रतीविवाह ५१ हजार रुपये अनुदान विवाहापश्चात महिन्याभरात द्यावे. कामगारांना सुरक्षासंच व अत्यावश्यक सुविधा त्वरित सुरु कराव्यात.पदविका शिक्षण व औद्यागिक शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांकरिता शिष्यवृत्ती योजना त्वरित सुरु कराव्यात.सरकारी कामगार कार्यालयात मनमानी कारभार करणाºया कर्मचाºयांची हकालपट्टी करावी तसेच नोंदणीकृत संघटनेकडून कामगारांचे विविध अर्ज स्वीकारण्यात यावे, अशा विविध मागण्यांसाठी सोमवारी स्वाभिमानी बांधकाम कामगार संघटनेच्या कार्यालयातून मोर्चा काढण्यात आला. शहरातील मुख्य मार्गाने निघालेल्या या मोर्चाने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.यावेळी हा मोर्चा न्यायालयाच्या मुख्य व्दारापुढेच अडविण्यात आला. स्वाभिमानी बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष उमेश अग्निहोत्री यांच्या नेतृत्वात निघालेल्या या मोर्चाला आमदार डॉ.पंकज भोयर व भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष राजेश बकाने यांनी संबोधित केले. त्यानंतर आमदार डॉ. पंकज भोयर, राजेश बकाने व उमेश अग्निहोत्री यांच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे यांना निवेदन देऊन विविध समस्यांचे निकारण करण्याची मागणी केली. या मोर्चात शशिकांत नाईक, राजू मुठाळ, दिलीप कोरे, सुरेश पिसे, नरेंद्र मानकर, आशिष बुरबुरे, मारोती मुठाळ, संगिता गोडे, सुरेश राजनकर, शोभा मेंढे व विजय आष्टनकर यांच्यासह असंख्य बांधकाम कामगार उपस्थित होते. 

टॅग्स :Socialसामाजिक