शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्त शिवार अभियानाचे ‘पुढे पाठ, मागे सपाट’

By admin | Updated: April 23, 2016 02:07 IST

भूगर्भातील जलपातळी वाढावी आणि शेतकऱ्यांना सिंचनाची सोय व्हावी या उदात्त हेतुने राज्य शासनाने....

चार कोटींची कामे : तांत्रिक अधिकारी नसल्याने खोळंबा आष्टी (शहीद) : भूगर्भातील जलपातळी वाढावी आणि शेतकऱ्यांना सिंचनाची सोय व्हावी या उदात्त हेतुने राज्य शासनाने सन २०१५-१६ पासून जलयुक्त शिवार ही महत्त्वाकांक्षी योजना कार्यान्वित केली. यासंदर्भात कृषी विभागाकडे कुठल्याही प्रकारची तांत्रिक कुशल यंत्रणा नसल्यामुळे या योजनेचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे. जिल्ह्यात वर्षभरात कोट्यवधी रुपयांची कामे झाली. त्याचे फलित २५ टक्के सुध्दा झाले नसल्याचे चित्र आहे. आर्वी, आष्टी, कारंजा तालुक्यात वर्षभरामध्ये ३ कोटी १२ लक्ष रुपयांचे नाला खोलीकरण व बंधारा बांधकाम झाले. नाला खोलीकरण अंदाजपत्रकात जास्त व प्रत्यक्षात कमी असल्याने नियोजन कोलमडले. पावसाळा झाल्यावर अनेक नाल्यातील पाणी वाहून गेले. त्यामुळे सिंचनासाठी त्याचा उपयोग झाला नाही. नाला खोलीकरण व बंधारे बांधकाम करण्याची जबाबदारी कृषी सहाय्यकांवर देण्यात आली. लाखो रुपये खर्च करतेवेळी तांत्रिक कर्मचारी असणे आवश्यक होते; मात्र तसे झाले नाही. मोजमापपुस्तिका रेकॉर्ड करणे, इस्टीमेंट बनविण्याची जबाबदारी कृषी सहाय्यकांना ठरवून देण्यात आली. हा प्रकार पुर्णत: चुकीचा ठरला. नियोजनाचा अभाव यातील प्रमुख कारण दिसत आहे. शेताच्या काठावर खोदकाम केल्यावर माती व्यवस्थीत लावण्यात आली नाही. त्यामुळे पाण्याच्या प्रवाहाने तीच माती नाल्यात पडली आहे. सद्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने जंगलातील पाण्याचे स्त्रोत संपुष्टात आले आहे. वन्यप्राण्यांना पिण्यासाठी पाणी नाही. अशावेळी जलयुक्त शिवारातील नाल्यामध्ये पाण्याची अपेक्षा होती. मात्र येथेही निराशाच झाली. कृषी विभागाने पाण्याची साठवण करण्यावर भर दिल्याचे दिसत नाही. केवळ उद्दिष्ट पूर्ती करण्यासाठी टार्गेट म्हणून काम केल्याची माहिती एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली. जलयुक्त शिवार योजनेचा दुसरा टप्पा २०१६-१७ मध्ये सुरू झाला आहे. यासाठी ई-निविदा निघाल्या. सदर निविदा ३५ टक्के कमी दराने जात असल्यामुळे या कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित होत आहे. शासनाने शासकीय निधीचे व्यवस्थीत नियोजन करावे आणि शेतकऱ्यांचा फायदा होईल, अशी कामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.(प्रतिनिधी)