शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांवर सोयाबीनचा ‘तोडा’ करण्याची वेळ

By admin | Updated: October 20, 2014 23:18 IST

वसूबारसपासून दिवाळीला सुरुवात होत असली तरी सर्वार्थाने धनत्रयोदशीपासून आपण दिवाळी सुरू झाल्याचे मानतो. सोयाबीन विकून कशीबशी दिवाळी साजरी करावी अशी अपेक्षा व्यक्त करीत

वायगाव (नि.) : वसूबारसपासून दिवाळीला सुरुवात होत असली तरी सर्वार्थाने धनत्रयोदशीपासून आपण दिवाळी सुरू झाल्याचे मानतो. सोयाबीन विकून कशीबशी दिवाळी साजरी करावी अशी अपेक्षा व्यक्त करीत असलेल्या शेतकऱ्यांवर सोयाबीनचे अत्यल्प उत्पादन झाल्याने सवंगणी न करता तोडा करण्याची वेळ आली आहे. निसर्गाच्या अवकृपेने यंदाही शेतकरी संकटात सापडला. कापसातूनही फारशा उत्पन्नाची आशा राहिलेली नाही. यावर्षी कोरड्या दुष्काळाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागला. दुबार-तिबार पेरणीनंतर मध्यंतरी आलेल्या पावसाने पिकांना काहीसे जीवनदान दिल्याने सोयाबिन कसेबसे उगवले. मात्र त्यानंतर पावसाने मारलेल्या दडीने शेतकऱ्याची अवस्था बिकट झाली. पाण्याअभावी सोयाबीनच्या शेंगाही व्यवस्थित भरलेल्या नाही. ज्यामध्ये काहीसे दाणे भरले आहेत तेही ज्वारीच्या दाण्यासारखे आहेत. या कारणाने एकंदरित उत्पन्न तर कमी झालेच पण जेथे एका झाडाला ६० ते ७० शेंगा यायच्या तेथे यंदा केवळ १५ ते २० शेंगाच पहावयास मिळत आहे. त्यामुळे सोयाबीन काढण्यापेक्षा एक तर त्यात जनावरे सोडावी किंवा सवंगणीपेक्षा त्याचा तोडा करावा, असा विचार शेतकऱ्यांच्या मनात येऊ लागला आहे.या परिस्थितीमुळे सोयाबीन पासून उत्पन्नाची कोणतीही आशा आता शेतकऱ्यांना राहिलेली नाही. कपाशीचीही अशीच अवस्था आहे. लाल्या आणि इतर कीडींच्या आक्रमणाने पऱ्हाटीच्या झाडावर बोंडेच धरलेली नाहीत. नांगरणीपासून वेचणीपर्यंतच्या प्रत्येक कामासाठी शेतकऱ्याला मोठा खर्च करावा लागतो. मात्र आजच्या स्थितीत एकरी दोन क्विंटलही कापूस होण्याची शक्यता नाही. त्यामुळे लागवडीचा खर्चही निघेल की नाही अशी भीती शेतकऱ्यांना आहे. यंदा कापसाला चांगला भाव मिळले का अशी शंकाही येऊ लागली आहे. त्यामुळे शेतकऱ्याची स्थिती केविलवाणी झालेली आहे. एका पाठोपाठ एक संकटाचा मारा झेलणारा शेतकरी पुरता हतबल झाल्याचे चित्र जिल्ह्यात दिसत आहे.(वार्ताहर)