शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
3
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
4
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
5
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
6
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
7
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
8
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
9
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
10
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
11
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
12
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
13
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
20
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
Daily Top 2Weekly Top 5

कापसाला ४,५०० रुपयांपेक्षा अधिक भाव मिळणे कठीण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 05:00 IST

भारतातही सरकीचे भाव १७०० रुपये क्विंटलपर्यंत कमी झाले आहेत. १ क्विंटल कापसातून ३४ किलो रुई तर ६४ किलो रुई निघते. ६३ सेंट प्रति पाउण्ड रुई आणि एका डॉलरचे मूल्य ७५ रुपये यानुसार ३४ किलो रुईचे ३ हजार ५३४ रुपये होतात. १७ रुपये प्रतिकिलो सरकी म्हणजे ६४ किलो रुईचे १,०८८ रुपये होतात. यानुसार १ क्विंटल कापसाला प्रक्रियेअंती ४ हजार ६२२ रुपये भाव मिळू शकतो.

ठळक मुद्देविजय जावंधिया : शेतकऱ्यांचा सर्व कापूस सीसीआयने घेणे हाच उपाय

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अमेरिकेच्या बाजारात रूईचे भाव ७० ते ७५ प्रति पाउण्डवरून ६० ते ६३ पाउण्डपर्यंत पडलेत. भारतातही सरकीचे भाव १७०० रुपये क्विंटलपर्यंत कमी झाले आहेत. १ क्विंटल कापसातून ३४ किलो रुई तर ६४ किलो रुई निघते. ६३ सेंट प्रति पाउण्ड रुई आणि एका डॉलरचे मूल्य ७५ रुपये यानुसार ३४ किलो रुईचे ३ हजार ५३४ रुपये होतात. १७ रुपये प्रतिकिलो सरकी म्हणजे ६४ किलो रुईचे १,०८८ रुपये होतात. यानुसार १ क्विंटल कापसाला प्रक्रियेअंती ४ हजार ६२२ रुपये भाव मिळू शकतो. त्यामुळे ४ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटलपेक्षा अधिक भावाने कापूस व्यापारी कसे खरेदी करेल, असा सवाल शेतकरी संघटनेचे पाईक विजय जावंधिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रातून केली आहे. कोरोनाचा संकटकाळ लक्षात घेता केंद्र सरकारने सीसीआयला शेतकऱ्यांकडील संपूर्ण कापूस खरेदी करण्याबाबत निर्देश द्यावेत, अशी मागणी विजय जावंधिया यांनी केली आहे.कोरोनाचे सावट असतानाच कापूस उत्पादक शेतकऱ्यांची लूट सुरू आहे. कोरोनाच्या प्रकोपापूर्वी कापूस पिकावर मंदीचे संकट होते. २०१८-२०१९ च्या तुलनेत यंदा कापूस उत्पादक शेतकऱ्यांना १ हजार रुपये प्रतिक्विंटल कमी भाव मिळेल. मात्र, केंद्र सरकारने कापसाला घोषित केलेले ५ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल समर्थन मूल्यही मिळू शकणार नाही, असे यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात विजय जावंधिया यांनी नमूद केले होते.कोरोनाच्या प्रकोपापूर्वी व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून ५ हजार ते ५ हजार २०० रुपये प्रतिक्विंटल कापूस खरेदी केला होता. यावर्षी सीसीआय व महाराष्ट्र पणन महासंघाने जवळपास ४५ टक्के कापसाची खरेदी केली आहे. कोरोनामुळे महामारीची चर्चा होताच पोल्ट्री व्यवसाय संकटात सापडला. सरकी बियाण्यांच्या भावात मंदी आली. व्यापाऱ्यांकडून कापूस खरेदी बंद झाली. लॉकडाऊननंतर सीसीआय आणि नाफेडकडून खरेदी बंद झाली. २० एप्रिलपासून संथगतीने कापूस खरेदी सुरू आहे. यामुळेच कापूस खरेदीतील गतिमानता पाहता पावसाळ्यापूर्वी शेतकऱ्यांकडे साठवून असलेला कापूस खरेदी अशक्य आहे. सीसीआयद्वारे केवळ फेअर अ‍ॅव्हरेज क्वालिटीचा कापूस खरेदी केला जातो. या धोरणात बदल गरजेचा आहे, कारण कुणीही व्यापारी चांगल्या प्रतीचा कापूस ४ हजार ५०० रुपयांपेक्षा अधिक भाव देऊन कापूस खरेदी करू शकत नाही, असेही जावंधिया यांनी म्हटले आहे.

टॅग्स :cottonकापूस